एक्स्प्लोर
यूट्यूब पाहून सांगलीच्या विद्यार्थ्याने आठ फुटी 'रायगड' साकारला
लहान मुलं दिवाळीतला किल्ला बांधण्यासाठीदेखील इंटरनेटची मदत घेऊ लागली आहेत. सांगलीतल्या एका चिमुरड्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून आठ फुटांचा रायगड साकारला आहे.
सांगली : हल्ली आपल्याला प्रत्येक काम करण्यासाठी इंटरनेटची मदत होते. लहान मुलंदेखील इंटरनेटचा वापर करुन आता स्मार्ट झाली आहेत. आता लहान मुलं दिवाळीतला किल्ला बांधण्यासाठी इंटरनेटची मदत घेऊ लागली आहेत. सांगलीतल्या एका चिमुरड्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून आठ फुटांचा रायगड साकारला आहे.
चित्रातील किल्ले पाहून अथवा स्वतःच्या कल्पकतेने दिवळीत किल्ले बनवणारी अनेक मुले आपण पाहतो. परंतु सांगलीतल्या या पठ्ठ्याने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून किल्ला साकारला आहे. सांगलीच्या शिवोदयनगरमध्ये राहणाऱ्या दर्शन बंडगर या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने यूट्यूबवर रायगडाचा व्हिडिओ पाहिला. त्याने रायगडाचे विविध बारकावे टिपले. त्यानंतर बारा दिवस मेहनत घेत त्याने तब्बल आठ फुटांची रायगडाची प्रतिकृती साकारली आहे.
असा आहे दर्शनचा रायगड
या किल्ल्यामध्ये रायगडावरील महादरवाजा, खुबलढा बुरुज, चोरदिंडी, हत्ती तलाव, बाजार, मंदिर, टकमक टोक, हिरकणी बुरूज अशा अनेक गोष्टींचा समावेश त्याने अत्यंत खुबीने केला आहे. रायगडावरील दाट असनारी वनसंपदादेखील या प्रतिकातमक किल्लात मोठ्या कष्टाने जशीच्या तशी उभारण्यासाठी दर्शनने कष्ट घेतले आहेत. काही ठिकाणी झाडांची उंची कमी, काही ठिकाणी जास्त राहील, याची दक्षता त्याने घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement