एक्स्प्लोर
अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित
सांगलीतल्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलिसांचं निलंबन झालं आहे. ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस आणि रात्री ड्यूटीवर असणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं आहे.
सांगली : सांगलीतल्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलिसांचं निलंबन झालं आहे. ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस आणि रात्री ड्यूटीवर असणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं आहे.
अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना दमदाटी, जबरदस्ती करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. यातील अनिकेत कोथळेवर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापरल्यामुळे, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली होती.
विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, या दोन्ही आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.
आज याप्रकरणात आणखी 7 आरोपींना निलंबित करण्यात आलं आहे. यात ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस आणि ड्यूटीवरील 4 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलिसांचं निलंबन झालं आहे.
दरम्यान, सांगलीतल्या लकी बँग हाऊसमध्ये अनिकेत कामाला होता. त्याठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
अनिकेतच्या हत्येची सुपारी पोलिसांनाच दिल्याचा दावा अनिकेतच्या भावाने केला. त्यामळे या सेक्स रॅकेटशी संबंधित दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी होणार आहे.
संबंधित बातम्या
अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?
मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?
सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement