एक्स्प्लोर

अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर भाजपला मोठा धक्का, वैभववाडीतील 7 नगरसेवक शिवसेनेत

नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते सेनेत प्रवेश करत आहेत. सर्व सात माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष , नगरसेवक आहेत. नितेश राणे कालपर्यंत त्याच्या परिवारावर दबाव टाकत होते. त्यांना तिकिट दिलं जाणार नाही असं बोलणं चुकीचं ठरेल, असं सतीश सावंत यांनी सांगितलं.

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेले. त्यानंतर वाभदे वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. वाभदे-वैभववाडी नगरपंचायतमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. 17 पैकी 17 नगरसेवक हे भाजपकडे होते. मात्र काल त्यातील 7 नगरसेवक फुटून आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहेत. रवींद्र रावराणे,  संजय चव्हाण, संपदा राणे,  रवींद्र तांबे,  स्वप्निल इस्वलकर, संतोष पवार, दीपा गजोबार या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांना सेनेत प्रवेश होत आहे. नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते सेनेत प्रवेश करत आहेत. सर्व सात माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष , नगरसेवक आहेत. नितेश राणे कालपर्यंत त्याच्या परिवारावर दबाव टाकत होते. त्यांना तिकिट दिलं जाणार नाही असं बोलणं चुकीचं ठरेल, असं सतीश सावंत यांनी सांगितलं.

 शिवसेनेला व्हॅलेंटाईनची भेट - नितेश राणे

शिवसेना हे आमजं जुनं प्रेम आहे. त्यामुळे भाजपमधून जात असलेले सात नगरसेवक ही आमच्याकडून शिवसेनेला व्हॅलेंटाईनची भेट आहे. उद्या तिथं निवडणूक लढवायलाही शिवसैनिक उरला नाही म्हणून कोणी राणेंकडे बोट दाखवाला नको. कारण शेवटी कोकणात शिवसेना ही नारायण राणेंनीच बनवली होती. नितेश राणेंनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला.
अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर भाजपला मोठा धक्का, वैभववाडीतील 7 नगरसेवक शिवसेनेत

भाजपला तळकोकणात मोठा धक्का बसला आहे. मात्र भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी निवडणुकीच्या तोंडावर हे राजकारण असल्याचं म्हटलं आहे. दोन महिण्यापूर्वी आरक्षण पडून जे 7 नगरसेवक सेनेत गेलेत त्यांना त्याठिकाणी भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याने ते शिवसेनेत गेले आहेत. अमित शाह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने भाजप अजून मजबूत होणार असून वैभववाडी नगरपंचायतमध्ये आगामी निवडणुकीत 17 पैकी 17 जागा भाजप निवडणूक आणेल, असं भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी म्हटलं.

वैभववाडीला आरक्षण तीन महिन्यापूर्वी पडल्यानंतर ह्या लोकांमध्ये चलबिचल झाली होती. आपल्याला तिकीट याठिकाणी मिळणार नाही. म्हणूनच त्यांचे त्यांना असं वाटत होतं की आपल्याला बाजूच्या वार्डमधून त्या ठिकाणी तिकीट मिळावं. वैभववाडी परिस्थिती अशी होती, वैभववाडीमध्ये 17 नगरसेवक हे भाजपकडे आलेले होते. त्यातले आज 7 नगरसेवक जातायेत. त्यातली तीन नगरसेवक अपक्ष निवडून आलेले होते. 7 नगरसेवक गेलेत त्या सगळ्यांना आपल्याला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जायला मिळालेच पाहिजे अशा प्रकारची इच्छा होती. पण भाजप त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकत नव्हतं. म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला, असं तेली म्हणाले

मात्र ज्या पद्धतीने त्यांना पब्लिसिटी आपण सगळ्या लोकांनी दिली. वैभववाडीत एकूण मतदान अठराशेच्या आत असून नगरसेवक निवडून येतात ते 100 ते 150 मतांच्या आतमध्ये असलेले नगरसेवक आहेत. नगरपालिकेची आरक्षण पडल्यानंतर या सगळ्या गोष्टींची सुरुवात या ठिकाणी झाली. एका ते दोन महिन्यांच्या आत या ठिकाणी निवडणुका होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप इतका मजबूत आहे. उद्या दोन महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप 17 पैकी १७ जागा वाभादे वैभवाडीत जिंकणार. आत्तापर्यंत ह्या जिल्ह्यांमध्ये अनेक गोष्टी अशा घडल्या मात्र ग्रामपंचायतीत कुठलाही फरक पडला नव्हता. भाजप पक्ष मजबूत आहे. अमित शाह आल्यानंतर कोकणात भाजप अजून मजबूत झालेला आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे, अमित शाह जिथे जिथे गेले त्या ठिकाणी भाजप अधिक मजबुतीने उभा राहिला. म्हणून आम्ही उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असंही तेली यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Embed widget