एक्स्प्लोर
ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ठाणे : ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तसंच त्याचा पदभारही एका मंत्र्याला स्वतंत्रपणे देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये कुणबी महोत्सवात त्यांनी ही घोषणा केली आहे. शहापूरातील कुणबी महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पाण्याच्या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. "पाण्याच्या प्रकल्पासाठी वेगळं धोरण आखलं जाणार आहे. तसंच प्रकल्पासाठी जागा देणाऱ्या नागरिकांना प्राधान्यक्रमानं पाणी देण्यात येईल" असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील पर्यटन वाढावं यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याच्या सुचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















