एक्स्प्लोर
दुधाचा तुटवडा, पुण्यात 80 रुपये लिटरने विक्री
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पुणे शहरात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुरुवारी शेतकऱ्यांच्या दिवसभराच्या आंदोलनामुळे शहरात दुधाची आवकच झाली नाही, त्यामुळे दूधविक्रेत्यांनी या संधीचा फायदा घेत दुधाचे दर वाढवले आहेत.
पुण्यात 56 रुपये लिटर असलेलं म्हशीचं दूध 80 रुपये प्रतिलिटरने विकलं जातं आहे. तर 40 रुपये लिटरने मिळणाऱ्या गायीच्या दुधाची 60 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केली जातं आहे. दुधाचे दर जरी वाढले असले तरी दूध खरेदीसाठी पुणेकरांनी मात्र दुकानांबाहेर लांब रांगा लावल्या आहेत.
दुसरीकडे शेतकरी संपावर असल्याने मुंबईतील दूध संकलन कमी झालं आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात आजपासून दुधाची टंचाई होऊ शकते. त्यासाठी गुजरातहून मोठ्या प्रमाणवर दुधाची आवक होणार आहे.
मुंबईला कुठून किती दूध आवक होते?
मुंबईला दररोज 60 लाख लिटर दुधाची गरज भासते.
- इंदापुरातील सोनाई डेरी 18 ते 20 लाख लिटर संकलन आहे. त्यातील मुंबईला दररोज एक लाख लिटर दूध पाठवलं जातं.
- अमूलकडून मुंबईत दररोज 11 लाख लिटर दूध विकलं जातं.
- कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचे दररोज मुंबईला 7 लाख लिटर, तर वारणा दूध संघाचे अडीच लाख लिटर दूध मुंबईला जाते.
- नाशिकहून मुंबईला 1 लाख 80 हजार लिटर पुरवलं जातं.
ठाण्यात फारसा परिणाम नाही
तर ठाण्यात दुधाच्या पुरवठ्यावर आज फारसा परिणाम झालेला दिसत नाही. ठाणे जिल्ह्यात दररोज 2.50 लाख लिटर दुधाची आवक होते. मात्र आज ही आवक 2.10 लाख लिटरच झाली आहे. ठाण्यात पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, जळगाववरुन काही प्रमाणात दुधाची आवक काही प्रमाणात झाली आहे, तर गुजरातमधूनही अमूल दूधाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. शहरात पोलिस बंदोबस्तात दुधाच्या गाड्या दाखल होत आहेत. दरम्यान आज संप कायम राहिल्यास उद्या दुधाची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
नाशिक दूध खरेदीसाठी झुंबड
नाशिकमधून गुजरातला जाणारा टँकर रोखण्यात आला. सिद्ध पिंप्री गावात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर सोडून निषेध व्यक्त केला. एकीकडे दूध रस्त्यावर फेकलं जातं आहे, तर नाशिकमध्ये दूध आल्यानंतर नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडताना पाहायला मिळत आहे. लवकर पोहोचलं नाही तर दूधही मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून काही दिवस शेतकऱ्यांचा संप सुरु राहिला तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे
नगरमधील संकलन ठप्प
अहमदनगरला शेतकऱ्यांचा संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एका दिवसाचं 20 लाख दूध संकलन सलग दुसऱ्या दिवशी बंद असल्याने पुणे, मुंबई आणि ठाण्याचा दूध पुरवठा ठप्प आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement