(Source: ECI/ABP News/ABP Majha)
School Reopening : राज्यात आजपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरु; काय आहे नियमावली?
शाळा (School Reopen) सुरु करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावं. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे अशी सूचना दिल्या आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनामुक्त भगाात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा आजपासून सुरु होणार आहे. शाळा सुरु करताना सरकारनं नियमावली आखून दिली आहे. त्या नियमांचं पालन करणं शाळांना बंधनकारक असणार आहे. यात ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना गाव पातळीवर देण्यात आल्या आहेत. तसेच शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन नियोजन करावं, असे आदेश शिक्षण विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शाळा सुरु करताना टप्प्याटप्प्यानं विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावं, अशा सूचनाही शिक्षण विभागानं दिल्या आहेत.
Also Read : Maharashtra SSC Result 2021 Live Update: आज दहावीचा निकाल, पाहा महत्वाचे अपडेट्स
विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. या सर्व नियमांचं पालन करत आजपासून राज्यात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
ज्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करायचे आहेत. त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा. शिवाय,ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत.
शाळा सुरु करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावी. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशी सूचना दिल्या आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी आणि दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील्या शाळा सुरु करण्यासाठी प्रशासनातर्फे कोणती नियमावली जाहीर :
- राज्यातील कोविड मुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरु होणार
- ज्या गावात आठवी ते बारावी वर्ग सुरु करायचे आहेत. त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा
- ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या.
- शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते
- शाळा सुरु करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावं.
- केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे अशी सूचना दिल्या आहेत.
- एका बाकावर एकच विद्यार्थी आणि दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे.
- शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे.
- कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, देशभरातील इतर राज्यातही आजपासून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. त्यानुसार, काही निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. अशातच आजपासून शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच, अनेक राज्यांत शाळा, कॉलेज सुरु करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, चंदीगड, आंध्रप्रदेश या राज्यांत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.