एक्स्प्लोर

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना सत्यशोधन समितीकडून क्लीन चीट; मार्क वाढवल्याचा होता आरोप

परीक्षेच्या लॉगिन आयडी संदर्भात कुलगुरुचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेप नसल्याचा अहवाल सत्यशोधन समितीने दिला आहे. स्वतःचा लॉगीन आयडी वापरुन विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचा आरोप काही संघटनांनी कुलगुरुंवर केला होता.

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी स्वतःचा लॉगीन आयडी वापरुन विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात सखोल चौकशी केली असता, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठलाच हस्तक्षेप दिसून येत नसल्याचा अहवाल सत्यशोधन समितीने विद्यापीठ प्रशासनास सुपूर्द केला आहे. कुलगुरू यांच्यावरील आरोपात कोणतेच तथ्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे. काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कुलगुरूंच्या नावाचा बेकादेशीर लॉगिन आयडी वापरला आहे, असेही समितीने म्हटले आहे. कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्यावर स्वतःचा लॉगीन आयडी वापरून वि. गु. शिवदारे फार्मसी कॉलेजमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडून त्रिसदस्यीय सत्यशोधन समिती नेमून चौकशी करण्यात आली. या समितीच्या चौकशीत लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करण्याचे अधिकार एमकेसीएल, पुणे आणि विद्यापीठाचे यंत्रणा विश्लेषक पी. आर. चोरमले यांच्याकडे असल्याचे दिसून आले. तत्कालीन परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांच्या आदेशानुसार कुलगुरू यांच्या नावे एमफडणवीस या नावाने लॉगीन आयडी तयार करुन त्याच्या पासवर्डसह एमकेसीएलने 15 जानेवारी 2019 ला ईमेल केल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांना कोणतीच कल्पना नव्हती. त्यामुळे विद्यापीठातील परीक्षा विभागातील काही अधिकारी कुलगुरू यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे लॉगीन आयडी व पासवर्ड वापरत असल्याचे आढळून आले आहे. कुलगुरुंच्या लॉगीन आयडीचा गैरवापर - एमफडणवीस या लॉगीन आयडीद्वारे जानेवारी 2019 आणि जून 2019 या महिन्यात पाच परीक्षेच्या क्रमांकात बदल झाल्याचे आढळून आले आहे. बदल झालेल्या वेळी कुलगुरू डॉ. फडणवीस या प्रवासात आणि वेगवेगळ्या कार्यालयीन बैठकीत असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरापासून परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी कुलगुरु यांना अंधारात ठेवून बेकायदेशीर काम केल्याचे या समितीने निदर्शनास आणून दिले आहे. विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी हा कटकारस्थान रचल्याचे दिसून आल्याचे सत्यशोधन समितीने म्हटले आहे. सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून याविषयी विद्यापीठाने अधिक चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे संयुक्तिक राहील, असे या समितीने म्हटले आहे. भविष्यामध्ये चुकीच्या, नियमबाह्य व बेकायदेशीर प्रकार घडू नयेत, यासाठी विद्यापीठाने उपाययोजना करताना संगणक कक्ष व सर्वर खोलीत त्वरित सी सी टी व्ही बसवून योग्य त्या सुरक्षा व उपाययोजनांचा वापर करून नियंत्रण ठेवण्याबाबत व कारवाई करण्यासंदर्भात समितीने शिफारस केले आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली. वाचा - सोलापूर विद्यापीठात आमदाराच्या नापास नातेवाईकाला पास केले, एनएसयुआयचा आरोप, कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी Solapur University | आमदारांच्या नातेवाईकांचे गुण वाढवल्याचा सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंवर आरोप | ABP Majha
मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget