ऐकावं ते नवलच! साताऱ्यात महिलेनं एकाच वेळी दिला चार बाळांना जन्म, कंदी पेढे वाटून केला आनंद साजरा
साताऱ्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका 27 वर्षीय महिलेनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. या घटनेमुळं सर्वजण थक्क झाले आहेत.
Satara : सातार्यात एक असा चमत्कार घडला आहे. या चमत्काराने डॉक्टरांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाचं थक्क करुन सोडलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सलाही टक्कर देईल अशीच घटना घडली आहे. साताऱ्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका 27 वर्षीय महिलेनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. या घटनेमुळं सर्वजण थक्क झाले आहेत.
चार बाळांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश
कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय महिलेने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला आहे. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला 2 जुळी बाळं आणि नंतर एक बाळ झालं होतं. म्हणजेच एका मातेनं तब्बल सात बाळं जन्म दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:























