एक्स्प्लोर
संतोष पोळने केलेल्या हत्याकांडप्रकरणी 2700 जणांचे पंचनामे : नांगरे-पाटील
सातारा : साताऱ्यातील वाईमधल्या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2700 जणांचे पंचनामे केल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. आरोपी संतोष पोळने सात खून केल्याची कबुली दिली होती.
वाईतील कसाई संतोष पोळने केलेल्या सात हत्यांमुळे अवघ्या राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अतिशय बारकाईने आणि योग्य दिशेने तपास करत आहेत. या सर्व हत्यांमागे पैसे किंवा सोन्याचा हव्यास ही कारणं असावीस असा अंदाजही नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
क्रूरकर्मा संतोष पोळकडून सातव्या खुनाची कबुली
तसंच धुळ्यातील एक डॉक्टर बेपत्ता असून त्याचा संतोष पोळ प्रकरणाशी काय संबंध आहे का, या दृष्टीनेही तपास सुरु असल्याचं विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितलं. कसा सापडला संतोष पोळ? 13 वर्षात 7 खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. 16 जून 2016 ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे.संतोष पोळ हत्याकांड: घोटवडेकर रुग्णालयाचा काही भाग सील
कसं झालं हत्यांचं प्लॅनिंग ? संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 13 वर्षात संतोषशी संबंध आलेल्या 5 महिला बेपत्ता झाल्या. पोलिसात तशा तक्रारी आल्या. पण तपास लाल फितीत अडकल्यानं संतोष पोळ मोकाट होता. पोलिसांच्या दाव्यानुसार हत्यांमध्ये फक्त आणि फक्त आर्थिक देवाणघेवाणीचाच संबंध आहे. त्यामुळे 5 हत्यांशिवाय संतोषनं आणखी काही लोकांचाही गळा घोटलाय का? याचाही तपास सुरु आहे.'ते' सहा मृतदेह उकरणार्या कर्मचार्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
स्वत:ला डॉक्टर म्हणवणाऱ्या संतोषचा कारभार सुरुवातीला एका पडक्या घरातून चालायचा. माती आणि पत्र्याचं घर. धोमचा परिसर थोडा आडवळणाचा, त्यामुळं कुणी आजारी पडलं तर आजूबाजूच्या गावांमधील लोकांना संतोष पोळचाच आधार होता आणि त्याचाच फायदा संतोष घ्यायचा. महिलांना एड्सची भीती दाखवून शोषण महिलांना गुप्तरोग आणि एड्स झाल्याची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण सुरु करायचा. अर्थातच भीतीचं भांडवलं. डॉक्टरकीच्या नावाखालीच संतोष पोळची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उठबस होती. त्यामुळे गावातलं कुणीही संतोषविरोधात बोलायचं धाडस करत नव्हतं. अगदी संतोषच्या वागण्याबोलण्यात संशय जाणवल्यावर सुद्धाही.एसपी साहेब, तुम्हाला एक ग्रेट सॅल्युट, डॉ. पोळचं पत्र
संबंधित बातम्याडॉ. संतोष पोळचा आणखी एक धक्कादायक खुलासा
डॉ. पोळच्या फार्म हाऊसवर दोन खड्डे, आणखी 9 जण बेपत्ता
13 वर्ष.. सहा हत्या.. डॉ. पोळच्या कृत्याने साताऱ्यात थरकाप
मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली
पाहा व्हिडीओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement