एक्स्प्लोर
ट्रॅव्हल्सच्या धडकेत महिलेचा मृत्यू, जमावाच्या मारहाणीत चालक ठार
अपघातात महिलेचा चिरडून मृत्यू झाला, तर चौघं जण गंभीर जखमी झाले आहेत.

सातारा : ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत महिलेचा चिरडून मृत्यू झाला, तर त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत ट्रॅव्हल्स चालकालाही प्राण गमवावे लागले आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर हा अपघात घडला. पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्याजवळ पाच प्रवासी गाडीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी आलेल्या ट्रॅव्हल्सने पाचही जणांना चिरडलं. यामध्ये महिलेचा चिरडून मृत्यू झाला, तर चौघं जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जमावाने ट्रॅव्हल्स चालकाला खाली खेचलं आणि त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती, की चालकाचा मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा























