एक्स्प्लोर

साताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण, भारत-चीन सीमेवरील संघर्षात जाधव शहीद

शहीद जवान सचिन जाधव हे तीन महिन्यांपूर्वी दोन महिन्यांच्या सुट्टीसाठी गावी आले होते. मात्र भारत चीन तणाव वाढत असल्यामुळे त्यांची एक महिन्याची सुट्टी रद्द करण्यात आली होती.

सातारा : देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं आहे. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या गावाकडे आणलं गेलं. दुसाळे गावातील सचिन संभाजी जाधव यांना भारत-चीन सीमेवरील लेह लडाख भागात वीरमरण आले. बुधवारी भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले.

शहीद सचिन जाधव यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शहीद सचिन जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा दिल्लीतून पुण्याला पोहोचले तिथून सचिन यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दुसाळेला पोहोचेल आणि त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारत-चीन यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात हे जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तारळे येते पार्थिव पोहोचल्यानंतर तिथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसाळे गावापर्यंत त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून घेऊन गेले. गावागावात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर फुलांचा सडा टाकला.

शहीद जवान सचिन जाधव हे तीन महिन्यांपूर्वी दोन महिन्यांच्या सुट्टीसाठी गावी आले होते. मात्र भारत चीन तणाव वाढत असल्यामुळे त्यांची एक महिन्याची सुट्टी रद्द करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच येऊन गेलेल्या सचिन यांच्या अशा जाण्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजित पवारांकडून श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, महाराष्ट्राचे वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आलं. त्यांच्या शौर्याला वंदन करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! जाधव कुटुंबीय आणि दुसाळे ग्रामस्थांच्या दुःखात महाराष्ट्रासह संपूर्ण देश सहभागी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget