एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकरी आत्महत्येचा देखावा पाहिला, घरी अनुकरण करताना चिमुकल्याला गळफास
गोरेगाव वांगी इथं एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा देखावा केला होता. हा जिवंत देखावा पाहून सुमीत शुक्रवारी रात्री आला.
सातारा: गणेशोत्सवातील शेतकरी आत्महत्येचा देखावा पाहिल्यानंतर, तसाच देखावा घरी करुन बघताना शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी इथं शनिवारी ही धक्कादायक घटना घडली.
सुमीत शिंदे असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या 13 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
गोरेगाव वांगी इथं एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा देखावा केला होता. हा जिवंत देखावा पाहून सुमीत शुक्रवारी रात्री आला.
त्यानंतर शनिवारी सुमीत त्याच्या आईसोबत शेतात गेला होता. शेतात आईसोबत काही काम केलं. आईच्या आधी अर्धातास तो घरी परतला. त्याच्या डोक्यात गणेश मंडळात पाहिलेला शेतकरी आत्महत्येचा देखावाच होता.
घरी आल्यावर सुमीतने देखाव्यामध्ये शेतकऱ्याने ज्याप्रमाणे गळफास घेतला होता, तशाच पद्धतीने त्याने गळफास तयार केला. त्यावेळी घरी सुमीतची वयोवृद्ध पणजी होती. वयोमानामुळे तिला हलताही येत नाही. पण अशा परिस्थितीतही तीने सुमीत काय करतोय हे सातत्याने विचारुन, त्याच्याकडे चौकशी केली, पण काय होतंय हे तिला कळलंच नाही.
सुमीत शेतकरी आत्महत्येच्या देखाव्याचं अनुकरण करत होता आणि त्यातच त्याला गळफास लागला.
सुमीतची आई संध्याकाळी शेतातून घरी आली त्यावेळी पाहिलेलं दृश्य पाहून तिचा थरकाप उडाला. गळफास लागून सुमीत गतप्राण झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement