एक्स्प्लोर
कर्तव्यावरील पोलिसाच्या निलंबनाचा अधिकार चरेगावकरांना कसा?
सातारा : कराडमधल्या एका मतदान केंद्रावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर पोहोचले. गाडी थेट मतदान केंद्रात घातली... महिला पोलिसांनी आक्षेप घेतला.. आणि चरेगावकर भडकले. इतकंच नाही, तर साहेबांनी थेट निलंबित करण्यातची धमकीही दिली.
अध्यक्ष महोदयांचा बचाव सोपा आहे. कारण त्यांनी दावा केलेले शब्द कुठेही रेकॉर्ड झालेले नाहीत. पण या निमित्तानं एक प्रश्न मात्र पडतो. ही अशी पदं असलेल्यांना थेट मतदान केंद्राच्या आत आपल्या गाड्या नेण्याची परवानगी असते का?
चरेगावकरांनी कायदा पाळत गाडी बाहेर लावली असती, तर काय बिघडलं असतं? त्या महिला पोलिसांनी निवडणुकीची आचारसंहिता पाळणं हा गुन्हा आहे का? कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचा अधिकार चरेगावकरांना कुणी दिला? नियमांचा भंग केल्याप्रकरणी चरेगावकरांवरच कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर येत आहेत
भाजप नेते चरेगावकरांकडून महिला पोलिसाला शिवीगाळ?
खरंच त्या महिला पोलिसांनी शिवीगाळ केली का? याचीही चौकशी करा. पण त्याआधी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चरेगावकरांवर कारवाई होण्याची गरज आहे. तसं न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांच्या मनोधैर्याचं हे खच्चीकरण ठरेल. पाहा व्हिडिओ :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement