एक्स्प्लोर

मोठी बातमी! गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांचं मानधन वाढणार, मंत्री महाजनांचं आश्वासन, सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश

Sarpanch Demands : सरपंचांच्या आंदोलनाला यश आलं आहे. कारण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

Girish Mahajan on Sarpanch Demands : ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) संदर्भातील विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय संरपंच परिषदेच्या (Akhil Bhartaiy Sarpanch Parishad) वतीनं आंदोलन सुरु होते. मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो सरपंच एकवटले होते. दरम्यान, या आंदोलनाला यश आलं आहे. कारण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. सरपंचांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आठवड्यात मान्य करणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिलीय.

सरपंचांच्या मानधन वाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याची माहिती देखील मंत्री महाजन यांन दिली. ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. ग्रामपंचायतींच्या निधीबाबत सुवर्णमध्य काढला जाईल असंही महाजन यांनी सांगितलं. मानधन अल्प आहे, त्यात वाढ करावी, अशी मागणी सरपंचांनी केली होती. येत्या 8 दिवसांत कॅबिनेट निर्णय होईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.

इतर तांत्रिक मागण्या सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील

ग्रामपंचायतीमधील छोटी कामे असतील, तर 15 लाखांपर्यंत कामे द्यावीत अशी मागणी केली होती. पण कोर्टाचा निर्णय असल्याने 3 लाखांपर्यंत कामे देता येतात. त्यात देखील सुवर्णमध्य काढला जाईल असं महाजन यांनी सांगितलं. इतर तांत्रिक मागण्या आहेत, त्या सुद्धा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील. प्रमुख दोन्ही मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल असं महाजन यांनी सांगितलं. 

नेमक्या काय आहेत मागण्या?

सरपंचांना 15 हजार रुपये, उपसरपंचाला 10 हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला 3 हजार रुपयांचे मानध मिळावे
ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे
मुंबईत सरपंच भवनची स्थापना करावी
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करुन पंचायत विकास अधिकारी म्हणावे
ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करुन वेतनिश्चिती करावी
संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात आणावे
यावलकर समितीचा अहवाल लागू करावा
संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा
ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा

महत्वाच्या मागण्या:

16 ऑगस्टपासून 'गावगाडा बंद', सरपंच, ग्रामसेवक ते कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, नेमक्या मागण्या काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 12 March 2024ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 8PM 12 March 2025Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana News | विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? तटकरे स्पष्टच बोलल्या..Job Majha News | ST महामंडळ अंतर्गत नाशिकमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Embed widget