एक्स्प्लोर

संतोष पोळ हत्याकांड: घोटवडेकर रुग्णालयाचा काही भाग सील

सातारा: साताऱ्यामधील वाईच्या हत्याकांडप्रकरणातील आरोपी संतोष पोळ वाईतल्या ज्या रुग्णालयात काम करत होता. त्या घोटवडेकर रुग्णालयात पोलिसांनी तब्बल 8 तास कसून तपासणी केली. या तपासणीनंतर रुग्णालयातला काही भाग सील करण्यात आला आहे.   रुग्णालयाचा काही भाग सील केल्यानंतर काही संगणक आणि कागदपत्रांच्या फाईल्सही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. डॉ. पोळ हा घोटवडेकर रुग्णालयाल्या अतिदक्षता विभागात काम करायचा. संतोष पोळवर सहा हत्या केल्याचा आरोप आहे.   संतोष पोळकडून 6 हत्या   साताऱ्याच्या वाईमध्ये मंगल जेधे यांची हत्या करणाऱ्या डॉक्टर संतोष पोळने एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मंगल जेधे, सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे आणि वनिता गायकवाड अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. हत्या झालेले सहाही जण 2003 ते 2016 या कालावधीत सातारा आणि वाई परिसरातून बेपत्ता होते. यापैकी चार मृतदेह हे डॉ. संतोष पोळच्या फार्म हाऊसवर पुरण्यात आले होते.   कसा सापडला संतोष पोळ?   13 वर्षात 6 खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. 16 जून 2016 ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे.   कसं झालं हत्यांचं प्लॅनिंग ?   संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   13 वर्ष.. सहा हत्या.. डॉ. पोळच्या कृष्णकृत्याने साताऱ्यात थरकाप   13 वर्षात संतोषशी संबंध आलेल्या 5 महिला बेपत्ता झाल्या. पोलिसात तशा तक्रारी आल्या. पण तपास लाल फितीत अडकल्यानं संतोष पोळ मोकाट होता. पोलिसांच्या दाव्यानुसार हत्यांमध्ये फक्त आणि फक्त आर्थिक देवाणघेवाणीचाच संबंध आहे. त्यामुळे 5 हत्यांशिवाय संतोषनं आणखी काही लोकांचाही गळा घोटलाय का? याचाही तपास सुरु आहे.   स्वत:ला डॉक्टर म्हणवणाऱ्या संतोषचा कारभार सुरुवातीला एका पडक्या घरातून चालायचा. माती आणि पत्र्याचं घर. धोमचा परिसर थोडा आडवळणाचा, त्यामुळं कुणी आजारी पडलं तर आजूबाजूच्या गावांमधील लोकांना संतोष पोळचाच आधार होता आणि त्याचाच फायदा संतोष घ्यायचा.   महिलांना एड्सची भीती दाखवून शोषण   महिलांना गुप्तरोग आणि एड्स झाल्याची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण सुरु करायचा. अर्थातच भीतीचं भांडवलं. डॉक्टरकीच्या नावाखालीच संतोष पोळची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उठबस होती. त्यामुळे गावातलं कुणीही संतोषविरोधात बोलायचं धाडस करत नव्हतं. अगदी संतोषच्या वागण्याबोलण्यात संशय जाणवल्यावर सुद्धाही.   मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली   थंड डोक्याचा आणि क्रूर मानसिकतेच्या संतोषचं धाडस इतकं की त्यानं अगदी घराच्या बाजूलाच एक मृतदेह पुरला होता. संतोषच्या डॉक्टरकीच्या डिग्र्या किती खऱ्या आहेत, याचाही शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पण महिलांना मृत्यूचा घाट दाखवण्यासाठी त्यानं भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषधच हत्यार म्हणून वापरलं.   दिल्ली निठारी हत्याकांडानं गोठून गेली होती, आता साताराही हादरला आहे. त्यामुळे सावध राहा आणि बेसावधपणे कुणावरही विश्वास ठेऊ नका.  

संबंधित बातम्या

डॉ. संतोष पोळचा आणखी एक धक्कादायक खुलासा

मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली

13 वर्ष.. सहा हत्या.. डॉ. पोळच्या कृष्णकृत्याने साताऱ्यात थरकाप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget