संतोष देशमुख हत्या प्रकरण! CID चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल, तपासाची चक्र फिरवली
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh murder case) तपास करण्यासाठी CID चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल झाले आहेत.
Santosh Deshmukh murder case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh murder case) तपास करण्यासाठी CID चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीड शहर पोलिसात CID चे पथक पोहोचले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांकडून CID च्या पथकाने माहिती घेत तपास चक्र फिरवली आहेत. यामध्ये फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे CID चे पथक सध्या चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फरार आरोपींनी ज्या ज्या लोकांना संपर्क केला त्यांची चौकशी
दरम्यान, फेकलेल्या मोबाईलद्वारे फरार आरोपींनी ज्या ज्या लोकांना संपर्क केला त्यांची चौकशी पथकद्वारे सुरु असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत 100 हून जास्त लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या संदर्भात कोणीतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बीड शहर पोलीस ठाण्यात सध्या CID चे पथक तपास करत आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता या घटनेच्या तपासासाठीच्या घडामोडींना वेग आला असल्याचे चित्र आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे CID ला महत्वपूर्ण आदेश
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. अनेक दिवस उलटून देखील देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये काल (दि.28) सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक आणि मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी केली. दरम्यान, आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सीआयडीला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत. बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा,