एक्स्प्लोर

दाभोलकर हत्या प्रकरण : संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला एक जूनपर्यंत सीबीआय कोठडी

सरकारी वकीलांनी संजीव पुनाळेकर हा हत्येच्या साखळीतील कारस्थानामधे सहभागी असल्याचं न्यायालयासमोर सांगितले आहे. यावेळी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या कारणावरून अटकेत असलेला सनातनचा वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला एक जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
काल पुनाळेकर आणि भावेला अटक केल्यानंतर आज पुणे न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर केले. यावेळी  सरकारी वकीलांनी विक्रम भावेने दाभोलकरांचे मारेकरी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला हत्येसाठी रेकी करायला मदत केली आहे.
तसेच दाभोलकरांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यासाठी विक्रम भावेची चौकशी करणं आवश्यक आहे, असे सांगितले. तसेच संजीव पुनाळेकरने दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्याप्रकरणात वापरलेलं पिस्तुल नष्ट करण्यासाठी मदत केली असून मारेकऱ्यांच्या व्यापक कटाची माहिती उघडकीस येण्यासाठी पुनाळेकरची चौकशी करणं गरजेचं आहे, अशी बाजू मांडली.
पुनाळेकरने स्वतःच स्वतःची बाजू न्यायाधीशांसमोर मांडली
यावर संजीव पुनाळेकर याने स्वतःच स्वतःची बाजू न्यायाधीशांसमोर मांडली.  शरद कळसकर आठ महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानंतर लगेच त्याचा जबाब नोंदवला गेला. मग त्याच्या जबाबानुसार मला अटक करण्यासाठी इतका वेळ का लागला? असा सवाल त्याने केला. शरद कळसकर हा माझा आशील आहे. त्याच्या कृत्याची जबाबदारी माझ्यावर टाकली जाऊ शकत नाही, अशा शब्दात आपली बाजू मांडली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी
न्यायालयाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला एक जूनपर्यंत  पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकीलांनी संजीव पुनाळेकर हा हत्येच्या साखळीतील कारस्थानामधे सहभागी असल्याचं न्यायालयासमोर सांगितले आहे. यावेळी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
काल दोघांना मुंबईतून अटक
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने काल  सनातनचा वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला मुंबईतून अटक केलं आहे.  हत्येचा कटात सहभागी होणे आणि हत्येनंतर पुरावे नष्ट केल्याचे आरोप दोघांवर आहेत. संजीव पुनाळेकरवर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर नरेंद्र दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे, दाभोलकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत.
हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल नष्ट करण्यासाठी मदत
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार काल, शनिवारी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल नष्ट करण्यासाठी मदत केली होती. त्याचबरोबर हत्येवेळी दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता. संजीव पुनाळेकर हा दाभोलकर आणि पानसरे हत्याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात बाजू मांडत आहे. तसेच पुनाळेकर या प्रकरणातील फरार आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय सीबीआयला आहे.
विक्रम भावेला ठाण्यातील  बॉंबस्फोट प्रकरणी दोषी विक्रम भावेला 2008 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतनजवळ झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जामिनावर सुटल्यावर तो वकील संजीव पुनाळेकरला मदत करत होता. पुनाळेकरने शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला मुंबईतील खाडी पुलावरुन शस्त्र फेकून देऊन नष्ट करण्याची सूचना केली, त्यावेळी विक्रम भावे तेथे हजर होता.नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला एटीएसनं अटक करण्यात आली होती. दोघांच्या चौकशीत एटीएसला पुण्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचे धागेदोरे सापडले. त्यानंतर दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर अंदुरे आणि कळसकर हेच दोघे असल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिल्याची माहिती समोर आली होती.
संबंधित बातम्या

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकरसह दोघांना अटक, सीबीआयची कारवाई

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी सुरू असलेल्या संथ तपासाबद्दल हायकोर्टाची नाराजी 

दाभोलकर-पानसरे हत्या, तपासयंत्रणेच्या ढिलाईमुळेच आरोपी जामिनावर : हायकोर्ट

दाभोलकर हत्या : मीडियाला माहिती देऊ नका, हायकोर्टाने ATS प्रमुखांना सुनावलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget