एक्स्प्लोर

मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ आहोत : संजय राऊत

शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरुन भरलेलं ताट समोर असताना ताट उधळून लावण्याचा नतदृष्टपणा कुणी करणार नाही असंही राऊत म्हणाले.

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ नसून सगळं खुसखुशीत चालू असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ या मोडमध्ये आहोत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना भाजपतल्या सर्व कुरबुरी संपल्या असून आता सगळं खुसखुशीत आहे. भरलेलं ताट समोर असताना ताट उधळून लावण्याचा नतदृष्टपणा कुणी करणार नाही असंही राऊत म्हणाले. सत्तेत अधिकाराचा समसमान वाटप आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात जे ठरलेल आहे त्यानुसार पुढच्या सर्व गोष्टी घडतील असे संजय राऊत यांनी सांगितलं. जर लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची भेट घेतली तर काय होत? अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे. तसेच विठ्ठल आमचं आराध्य दैवत असल्याचही राऊत म्हणाले. VIDEO | आषाढी एकादशीला मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे एकत्र पूजेला? | ABP Majha राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीवर शिनसेनेला काय वाटतं? कोण कुणाला कशासाठी भेटतं याची डायरी घेऊन आम्ही बसत नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे आणि सोनिया गांधींच्या भेटीबाबत संजय राऊत दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी कालच्या भेटीची तुलना थेट बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधींच्या भेटीशी केली.  मात्र इंदिरा गांधींची तुलना कुणासोबतही होऊ शकत नाही, त्यांनी शिवसेनेच्या बरखास्तीचा डाव उधळून लावला होता, असंही संजय राऊत म्हणाले. VIDEO | सोनियांच्या साथीनं मनसे 'राज'? | माझा विशेष | एबीपी माझा राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीची बातमी येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरे जवळपास 14 वर्षांनंतर काल दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएम आणि निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्वाची मानली जातेय. लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांची नाराजी लक्षात घेता राज ठाकरे यांना काँग्रेसनं दूर ठेवलं होतं. पण आता राज्यातील गरज आणि राज यांची क्रेझ लक्षात घेऊन काँग्रेस मनसेला सोबत घेणार का हा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं या भेटीचं स्वागत केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
Embed widget