गद्दार हृदयसम्राट स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेतात - संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिासंनी घरात घुसून अटक केली.
Sanjay Raut : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिासंनी घरात घुसून अटक केली. 307 सारख्या गुन्ह्याचे आरोपी असतात तशी अटक केली. दळवींचा गुन्हा काय आहे ? त्यांनी माहाराष्ट्रातील लोकांच्या जनभवाना भांडूपमधील मेळाव्यात व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्यासोबत असणारे गद्दार हृदय सम्राट आहेत, ते स्वत:ला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात. त्यावर तमाम हिंदूचा, जनतेचा आक्षेप आहे.
गद्दार हृदय सम्राट स्वत:ला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात. हा वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची उपाधी स्वत:ला लावून घेतात. त्यासंदर्भात दत्ता दळवी यांनी भाषणामध्ये शिवसैनिक म्हणून भाषण केले. ते म्हणाले की, आनंद दिघे असते तर या गद्दारांना चापकाने फोडून काढलं असतं. त्यात काय चुकंच वापरलं. त्यांनी भोस** हा शब्द वापरला. हा शब्द धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी घातलेला आहे.. सेन्सरने तो शब्द हटवला नाही. तो शब्द अक्षेपार्ह असेल तर चित्रपटाच्या कलाकार, निर्मात्यांवरही गुन्हा दाखल केला का? तो शब्द दत्ता दळवींनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते?
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वक्तव्य केलं त्यांना अटक का नाही?
उद्धव ठाकरे नारायण राणे यांना नालायक म्हणाले ते काय चुकीचं बोलले. नालायकला नालायकच म्हणणार ना?
सुनील राऊत : आम्ही कायदेशीर प्रक्रिया आता पार पडली आहे.दत्ता दळवी यांना जामीन मिळेल. महाराष्ट्रात अशा प्रकारे चुकीचे गुन्हे दाखल केले जात आहेत.
दत्ता दळवींना अटक ?
भांडूप मध्ये रविवार (दिनांक 26 नोव्हेंबर) शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आज त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आजच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. .