एक्स्प्लोर

Sanjay Raut: राजकीय भविष्यासाठी आम्हा सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज; ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ खासदार संजय राऊतांचा 'रोखठोक' रोख नेमका कोणाकडे?

सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोलताना त्यांनी सांगितलं की अंधारात झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले आहेत. तुमचा हा राजकीय प्रवास असला तरी तुम्हाला इतिहास हा कलंकित करणारा आहे.

Sanjay Raut: शिवसेना फुटीचं ग्रहण सुरूच असताना आता आमदार सचिन अहिर यांनी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता खासदार फुटल्यानंतर आता आमदार सुद्धा फुटू लागल्याने शिवसेना ठाकरे गट गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे का? असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे. ही सर्व चर्चा होत असतानाच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक स्पष्ट वक्तव्य केल्याने नेमका रोख कोणाकडे? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की राजकीय भविष्यासाठी आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. 

झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले

सचिन अहिर फुटल्याने आदित्य ठाकरे यांची वरळी विधानसभेत अडचण वाढली आहे का? संदर्भात बोलताना म्हणाले की,  माणसाला समाधानी राहणं फार आवश्यक आहे. सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोलताना त्यांनी सांगितलं की अंधारात झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेले आहेत. तुमचा हा राजकीय प्रवास असला तरी तुम्हाला इतिहास हा कलंकित करणारा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, सगळं दिल्यानंतरही तुम्ही जात असाल, तर तुम्हाला राजकीय लालसा ही संपवून टाकत असते. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीही नको आहे. राज्यामध्ये नासाडी सुरू असून एक प्रकारे अधःपतन सुरू असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की पक्षासोबत राहणारे कार्यकर्ते हे दुर्मिळ असतात.

पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता, अहिरांचा मेसेज

सुनील शिंदे यांनी पराभव केल्यानंतर अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला होता, परंतु आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेवर आमदार करून, उपनेतेपद देऊन, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष करून आणि अख्खा पुणे जिल्हा त्यांच्या ताब्यात देऊन त्यांचे राजकीय भविष्य घडवलं असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत यांनी सांगितले की, सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यांना कोणी भेटत नव्हतं किंवा त्यांचं कोणी ऐकत नव्हतं असं ते सांगू शकत नाहीत, कारण आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब त्यांना रोजच भेटत होते. सचिन अहिर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवला होता की, "पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता आहे, माझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि भवितव्यासाठी हे करत आहे". यावर राऊत प्रश्न उपस्थित करतात की, मग सर्वसामान्यांनी कार्यकर्ता म्हणून कोणासाठी काम करायचं? अशी विचारणा त्यांनी केली. 

राऊत म्हणाले, त्यांनी यापूर्वी शरद पवार साहेबांनाही याच पद्धतीने पुढच्या करिअरसाठी सोडलं होतं. पवारांनी त्यांना धुळीतून शिखरावर नेलं, माडाचं प्रमुख केलं, अनेक वर्ष मंत्री केलं आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षही केले होते. परंतु, अचानक शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेत आले होते. त्यामुळे जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे कसे होणार? हे मूळ शिवसैनिक नाहीत. पक्ष हा नेहमी मूळ शिवसैनिकच वाढवतो, बाकी सगळी 'वाऱ्यावरची वरात' असते, जे येतात आणि जातात. सुनील शिंदे जे बोलले ते बरोबर आहे, आम्हाला सगळ्यांनाच आता आत्मचिंतनाची गरज आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Embed widget