Sanjay Raut: मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही; संजय राऊतांचा निर्धार
राऊत यांनी मुंबईचा महापौर मराठी अस्सल भगव्या रक्ताचा असेल असा निर्धार व्यक्त केला. महापौर ठाकरे बंधूंचा होईल, असे सांगत त्यांनी शिवसेना-मनसे युतीला ‘दिल और दिमाग से बनी हुई युती’ म्हटले.

Sanjay Raut: मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा (Sanjay Raut on Marathi Mayor) होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही, असा निर्धार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 'आमचा' याचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की, "आमचा म्हणजे मी हम या शब्दाने बोलतोय, म्हणजे ठाकरे बंधूंचा (Thackeray Brothers on Mayor) हो ठाकरे बंधूंचाच महापौर होणार आहे." जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्या पुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
'दिल और दिमाग से बनी हुई' युती (Shiv Sena MNS Alliance 2025)
संजय राऊत म्हणाले की, "हे मराठी बाण्याचे भारतीय जनता पक्ष किंवा मिंधे सांगतात तसे नाही. कोणी चिंता करू नये, महापौर होईल होईल तो आमचाच महापौर होईल. 'मराठी बाणा' असलेल्या पक्षांची ओळख फक्त शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये आहे. या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहेत. ही युती फार वेगळी आहे 'दिल और दिमाग से बनी हुई' युती असून ही फक्त राजकीय युती नाही. युती ही "तन मन धन हे हे दिल और दिमाग" अशी आहे.
ठाकरे बंधू एकत्र आले तरी मविआचे काय होणार? (Sanjay Raut on Maha Vikas Aghadi Future)
ठाकरे बंधू एकत्र आले तरी मविआचे काय होणार? यासंदर्भात विचारणा केली असता संजय राऊत म्हणाले की, मविआचे महत्त्व कायम आहे. कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सुळे सुद्धा होत्या. मविआ कुठेही गेलेली नाही सोडून आम्हाला. तिचं अस्तित्व कायम आहे, भूमिका कायम असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, महत्त्वाच्या महानगरपालिकांवर उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहे. या प्रमुख महानगरपालिकांवर आपल्याला काम करावं लागेल. विविध राजकीय जुळवाजुळवीच्या पर्यायांवर चर्चा होत असून कुठे शिवसेना, मनसे चालू शकते, कुठे महाविकास आघाडी सोबत घ्यावी लागेल, कुठे फक्त शिवसेना असेल, कुठे मनसे असेल, कुठे काँग्रेस असेल, कुठे राष्ट्रवादी असेल, असे त्यांनी सांगितले. त्या त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्मुला ठरवावा लागेल. काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे, विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. या सगळ्यांचा विचार या सगळ्यांचा पुढील निवडणुकात करावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या























