Sanjay Raut EXCLUSIVE interview | घोटाळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारू : संजय राऊत
Sanjay Raut EXCLUSIVE interview : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली असून त्यानी राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. घोटाळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारू असं स्फोटक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
![Sanjay Raut EXCLUSIVE interview | घोटाळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारू : संजय राऊत Sanjay Raut exclusive interview: Discussion on Varsha Raut ED inquiry Congress state president reshuffle and Bhandara accident Sanjay Raut EXCLUSIVE interview | घोटाळ्याचे आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना जोड्यानं मारू : संजय राऊत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/26031725/Sanjay-Raut.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut EXCLUSIVE interview : शिवसेनेचे नेते आणि खासदार यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आज ईडीनं चौकशीसाठी पुन्हा एकदा बोलावलं आहे. अशातच राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, तर आरोप करणाऱ्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्यानं मारू असं स्फोटक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यापासून ते भंडाऱ्यातील दुर्घटनेपर्यंत सर्व विषयांवर संजय राऊत यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.
संजय राऊत एक्स्क्लुझिव्ह मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले की, "राज्यातील नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याबाबत कोणतंही राजकारण करण्यात आलं, असं मला वाटत नाही. कारण आमच्याही सिक्युरिटी यापूर्वी काढलेल्या आहेत. त्यावेळी आम्ही कधी बोंबललो नाही. मागील सरकारच्या काळात आम्ही सरकारमध्ये असतानाही माझी सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दानं तक्रार केली नाही. सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते, त्यामध्ये महत्वाची लोकं असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा त्यांच्याशी सूडबुद्दीने वागावं असा ट्रेन्ड सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे असं कोणीही म्हणू शकणार नाही."
आरोप सिद्ध करा नाहीतर जोड्यानं मारु : संजय राऊत
संजय राऊत बोलतना म्हणाले की, "ज्या पद्दतीनं ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत अनेक आरोप केले. त्यानंतर काल राज्यातील प्रमुख नेत्यांबाबत, तसेच मी आणि माझ्या कुटुंबियांवरही आरोप केले. यांच्यात हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवावे. नाहीतर मी अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे, ते न्यायालयात जाईल. पण हे आरोप तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत, तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही. हे मी आधीच सांगितलं आहे." असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
"आम्ही गेली अनेक वर्ष राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलंय. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल एखाद्या पक्षानं वाईट प्रसिद्धी मिळवावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता आम्ही केली नाही. ठिक आहे, पाहू आम्ही, तुम्हीसुद्धा आहात आणि आम्हीसुद्धा आहोत." ; असं संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले.
पाहा व्हिडीओ :...तर त्यांच्या पक्षानं सांगावं, आमचा या व्यक्तीशी संबंध नाही : संजय राऊत
"ही कायद्याच्या पलिकडची भाषा असेलही, पण मला आणि माझ्या पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची आहे. जर कायद्याच्या पलिकडची भाषा असेल, तर जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत, त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? त्यांच्या पक्षानं सांगावं, आमचा या व्यक्तीशी संबंध नाही असं सांगावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगावं." असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
केंद्र सरकारला एक नवी यंत्रणा उभी करावी लागेल; भंडारा दुर्घटनेबाबत संजय राऊतांचं वक्तव्य
"मी असं म्हणतो की, 60 ते 65 वर्ष या देशात एक व्यवस्था होती. ती भाजपला मान्य नसेल, पण त्यांनी एक आरोग्यव्यवस्था उभी केली आहे. त्यापलिकडे आपण काय केलंय? गेल्या पाच ते सहा वर्षांत आपण आरोग्य यंत्रणेसंदर्भात पुढची पावलं काय टाकली आहेत. याच ऑडिट करावं लागेल. आजही आम्ही एम्समध्येच जातो. आजही त्या काळातील सरकारनं उभ्या केलेल्या आरोग्य व्यवस्थेचेच घटक आहोत. त्यामुळे केंद्र सरकारला एक नवी यंत्रणा उभी करावी लागेल, अनेक जिल्हा स्तरांवर. केवळ राज्याची जबाबदारी नाही."
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बदलले जात असले तरी, त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं : संजय राऊत
"विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विदर्भातील नाना पटोले तिथे अध्यक्ष आहेत. मी मीडियाच्या माध्यमातून पाहतोय की, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बदलले जात आहेत. जी काही नावं आहेत, त्यात नाना पटोलेंचं नाव आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहेत. त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्थता राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचं सरकार हे प्रदीर्घ काळ चालणार आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "निवडणूक कोणतीही होऊ द्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)