एक्स्प्लोर

येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल : संजय राऊत

येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होणार असून उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

नवी दिल्ली : 'येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल' असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असं देखील त्यांनी सांगितलं. दरम्यान आज संसद भवनात होणाऱ्या शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारलं असता पवार-मोदी भेट नेहमी खिचडीच नसते, पवार साहेबांना शेतीबाबत अधिक माहिती आहे. पंतप्रधान देशाचे आहेत. जर एखादी समस्या असेल तर कोणीही त्यांची भेट घेऊ शकतं, असंही संजय राऊत म्हणाले. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असून सत्तापेच कायम आहे. अशातच संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत केलेलं हे विधान मोठं आहे. तसेच पवार आणि मोदी यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्षं असून त्यासंदर्भात अनेक चर्चाही सुरु आहेत. Maharashtra Politics | शायरी, सियासत आणि शिवसेना | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha डिसेंबरच्या आत महाराष्ट्रात स्थिर सरकार महाराष्ट्रात एक मजबूत सरकार डिसेंबरपूर्वी स्थापन होईल, सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु असून महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे काही कायदेशीर बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. परंतु जेव्हा राज्यपालांकडे आम्ही बहुमताचा आकडा सिद्ध करू त्यावेळी ते आम्हाला सराकर स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील . ही एक प्रक्रिया आहे. याआधीही देशात असं झालेलं आहे. जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी याच प्रक्रियेतून सर्वांना जावं लागतं. येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल, उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले. पवार-मोदी भेट मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. जर एखादी समस्या असेल तर कोणीही त्यांची भेट घेऊ शकतं. पवार ओल्या दुष्काळासंदर्भात पंतप्रधानांची भेट घेणार असून राज्याला अतिरिक्त निधी देण्याबाबत विनंती करणार असल्याचं संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं. महाराष्ट्रातील दोनच नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली होती. एक म्हणजे, उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं त्याची त्यांनी पाहणी केली. पवार आज दिल्लीत असल्यामुळे मोदींची भेट घेऊन याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. Sanjay Raut PC | नव्या सरकारचं नेतृत्व शिवसेना करणार : संजय राऊत | ABP Majha भाजप सत्तास्थापनेत अयशस्वी संजय राऊत म्हणाले की, 'महाराष्ट्राचा देशातील सर्वात मोठ्या राज्यांमध्ये समावेश होतो. अशातच सर्वात मोठा पक्ष असलेलं भाजप सरकार स्थापन करण्यात असमर्थ आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी इतर पक्षांवर येते. इतर पक्षांकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहे. राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे. कारण राज्यात अनेक समस्या आहेत. राज्यातील शेकऱ्यांच्या प्रश्नासोबतच इतरही समस्या आहेत, तसेच लोकांचीही इच्छा आहे की, स्थिर सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं.' शिवसेनाप्रमुखांचा आदेश अंतिम आमच्या पक्षात कधीच दुमत नसतं. शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतात तो अंतिम असतो. आमच्या पक्षात काय सुरु आहे आम्हांला माहित आहे, तुम्हाला याव्यतिरिक्त काही समजलं असेल तर ते चुकीचं आहे. उद्धव साहेब सांगतील तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय असतो. आमच्याकडे कोणत्याही क्रिया-प्रक्रिया नसतात, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Embed widget