पोलिस अकार्यक्षम, 50 लाख पकडून 50 हजार दाखवतात, एक वर्ष हराXXX केला नाही तर सगळं सुतासारखं सरळ होईल; शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी आज महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.

Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी आज महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात अस म्हणत गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा?
सरकारने जर एखादी कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल, असेही गायकवाड म्हणाले. संजय गायकवाड यांच्या मुलाला एका निनावी पत्राद्वारे धमकी आली आहे. यावर पत्रकारांनी संजय गायकवाड यांना विचारलं असता ते म्हणाले की माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावं लागेल. पोलीस काहीही करु शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळं पोलीस हे अकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानासारखा घ्या..! पंतप्रधानांना आमदार संजय गायकवाडांचा सल्ला
मागच्या वेळी आठ महिने सीमेवर फौजा उभ्या राहिल्या, मात्र काहीच झालं नाही. एकदाच पाकिस्तान चिरडून पीओके ताब्यात घ्या असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. या पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करण्याचा निर्णय घेतो. एकदाच पाकिस्तानला चिरडून टाकलं पाहिजे, ध्वजारोहण करण्याची हिंमत आपल्यामध्ये राहत नाही एवढ्या भीतीचं वातावरण काश्मीरमध्ये आहे. देशातील मंदिरं सुरक्षित नाहीत, एकदाच पीओके ताब्यात घेऊन बॉर्डर करा. मागच्या वेळेस आठ आठ महिने सीमेवर फौजा उभ्या राहिल्या मात्र काहीच झालं नाही. निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानासारखा घ्या, असा सल्ला आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.
संजय गायकवाड हे सातत्यानं त्यांच्या विविध वक्तव्यानं चर्चेत असतात. सध्या राज्यातील भाषेचा वाद तात्पुरता मिटला असतानाच काल आमदार संजय गायकवाड यांनी राज्यात उर्दू भाषा देखील शिकवली पाहिजे, असे वक्तव्य केलं होते.
महत्वाच्या बातम्या:
























