एक्स्प्लोर
सहकाऱ्यांशी बोलल्याचा संशय, सांगलीत महिलेला जिवंत जाळलं
कारखान्यातील सहकाऱ्यांशी बोलल्याच्या संशयातून आणि पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून सांगलीत महिलेला जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

सांगली : सांगलीत एका महिलेवर रॉकेल ओतून तिघांनी तिला जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारखान्यातील सहकाऱ्यांशी बोलल्याच्या संशयातून आणि पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आलं.
ही घटना सांगलीतील कुपवाडमध्ये 4 एप्रिल रोजी घडली होती. सुरुवातीला या महिलेने स्टोव्हचा भडका उडाल्यामुळे आपण भाजले गेल्याचं डॉक्टरांना सांगितलं होतं. मात्र 20 एप्रिल रोजी खरी बाब समोर आल्यानंतर कुपवाड पोलिसांनी या महिलेचा जबाब घेतला. त्यामुळे तबल 17 दिवसांनंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला.
कारखान्यातील इतर सहकारी कामगारांसोबत बोलल्याच्या संशयातून आणि पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरुन तिघा जणांनी महिलेला पेटवलं. सीमा राजू नाईक असं या महिलेचं नाव असून ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयित मुख्य सूत्रधार म्हणून तिघांना अटक केली आहे.
सतीश शंकर शिंदे, नितीन शंकर शिंदे, पोपट नानासाहेब शिंदे अशी तिघांची नावं असून त्यांच्यावर महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झला आहे. यातील सतीश व नितीन दोघे सख्खे भाऊ असून पोपट हा त्यांचा नातलग आहे.
सतीश, नितीन आणि पोपट यांनी संगनमताने 4 एप्रिल 2018 रोजी दुपारी दीड वाजता प्लॅन तयार केला. सतीश व नितीन या दोघांनी पोपटच्या घरातून रॉकेलचा कॅन आणला आणि ते सीमाच्या राहत्या घरी गेले. तू कंपनीतील इतर कामगारांशी का बोलतेस? आणि आमच्या विरोधात पोलिसात तक्रार का देतेस? असं विचारुन त्यांनी सीमाच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि तिला पेटवून दिलं.
या घटनेत सीमा 50 टक्के भाजून गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवल्यानंतर शनिवारी 21 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
