एक्स्प्लोर

सांगली मनपा निकाल फिक्सिंगच्या अफवा, गुन्हा दाखल

उमेदवार आणि चिन्हांच्या यादीत फेरफार करुन निकाल फिक्स असल्याची अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरोधात शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली : नुकत्याच पार पडलेल्या सांगली महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी फिक्स झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्यामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली होती. उमेदवार आणि चिन्हांच्या यादीत फेरफार करुन निकाल फिक्स असल्याची अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरोधात शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका निवडणूक निकालापूर्वीच मिरजेतील प्रभाग चारमधील उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी फिक्स झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. महापालिका निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला. त्यातच मिरजेत प्रभाग चारमधील भाजप उमेदवारांच्या मतदानाच्या आकडेवारीचे अगोदरच सेटिंग झाल्याची अफवा वायरल झाली. प्रभाग चारसह अन्य प्रभागातील पराभूत उमेदवारांनीही न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला होता. प्रभाग चारमधील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीनंतर त्यांना मिळालेल्या चिन्हांसह प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरुन काढून नेऊन अज्ञाताने निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यावर चारही गटातील मतांची आकडेवारी खोडसाळपणे लिहिली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली. यादीमुळे पराभूत उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदानात घोटाळा झाल्याचा दावा करत होते. निकाल 18 जुलै रोजीच तयार झाल्याचा आणि प्रभाग चारमध्ये मतदानाची आणि मतमोजणीची आकडेवारी जुळत नसल्याचं सोशल मीडियावर म्हटलं गेल्याने संभ्रम निर्माण झाला होता. प्रभाग चारमधील विजयी झालेल्या भाजप उमेदवाराच्या निवडीविरुद्ध मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आक्षेप घेऊन अपक्ष उमेदवार अनिलभाऊ कुलकर्णी आणि शुभांगी रुईकर यांनी न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियावरील मतदानाची आकडेवारी बोगस असल्याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर निवडणूक निकाल आणि इव्हीएम यंत्राबाबत अपप्रचार केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली मनपा निकाल फिक्सिंगच्या अफवा, गुन्हा दाखल सांगली मनपा निकाल फिक्सिंगच्या अफवा, गुन्हा दाखल सांगली मनपा निकाल फिक्सिंगच्या अफवा, गुन्हा दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जाNashik Baby Kidnapping | नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची चोरी Special ReportSuresh Dhas On Santosh Deshmukh Case| बीडचा बिहार नाही, हमास केला, धस यांचा हल्लाबोल Special ReportLadki Bahin Yojana| लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Embed widget