एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसने सांगलीचं खेडं बनवलं : चंद्रकांत पाटील
सांगली शहराचा विकास करण्यासाठी भाजपा या निवडणुकीत उतरली असून 42 जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला.
सांगली : व्हिजन नसलेल्या काँग्रेसवाल्यांनी सांगलीचे खेडे बनवून ठेवले आहे, अशी टीका भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगली शहराचा विकास करण्यासाठी भाजपा या निवडणुकीत उतरली असून 42 जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला.
सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली. सर्व ठिकाणी भाजपचे सक्षम उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप या निवडणुकीत 42 जागांवर निश्चित विजयी होईल, असं ते म्हणाले.
भाजपचा प्रचार शुभारंभ हा रविवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. 28 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. रविवारी सायंकाळी प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर दानवे मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सांगली महापालिकेत पहिल्यांदाच स्वबळावर लढणाऱ्या भाजपच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांच्या जाहीर सभांचं नियोजन करण्यात आलं आहे.
रावसाहेब दानवे सांगलीचं ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदीर येथे भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्यानंतर टिळक स्मारक येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दानवे या मेळाव्याला संबोधित करतील.
सांगली महापालिकेसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे, तर 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल. सांगलीच्या 20 प्रभागांमध्ये एकूण 78 जागा आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement