सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, माजी महापौरासह नगरसेवकांना धक्का
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या (Sangli Municipal Corporation Elections 2025) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे.
Sangli Municipal Corporation Election 2025 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या (Sangli Municipal Corporation Elections 2025) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतीक्षा असणारी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. एकूण वीस प्रभाग आणि 78 वॉर्डसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये .काही माजी महापौर, नगरसेवकांना आरक्षण सोडतीत धक्का बसला आहे.
आरक्षण सोडतीमध्ये माजी महापौर, नगरसेवकांना धक्का
आरक्षण सोडतीमध्ये माजी महापौर संगीता खोत, कांचन कांबळे, मैनुदिन बागवान, गीता सुतार यांना आरक्षण सोडतीत आरक्षण बदल झाल्याने धक्का बसलाय. तर मनोज सरगर, आनंदा देवमाने, योगेंद्र थोरात, विष्णू माने, जगनाथ ठोकळे, अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, विनायक सिंहासने, सुबराव मद्रासी या नगरसेवकाना या आरक्षण सोडतीत धक्का बसला असून त्याच्या वार्डात आरक्षण बदल झाला आहे. आज निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये 78 वॉर्डापैकी अनुसूचित जातीसाठी 11 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याच्यापैकी 6 जागा त्या प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक जागा यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे मात्र यावेळी अनुसूचित जमाती महिलासाठी कुठल्याही जागा आरक्षित करण्यात आली नाही.
नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण 21 जागा आरक्षित
नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण 21 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत आणि त्याच्या पैकी 11 जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबतच सर्वसाधारण जागाची संख्या एकूण 45 आहे आणि त्याच्यापैकी 22 जागा सर्वसाधारन महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
प्रभाग निहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक: 1
अ) SC
ब) ना.मा.प्र.महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 2
अ) SC महिला
ब) ना.मा.प्र
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : 3
अ) SC
ब) ना.मा.प्र. महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : 4
अ) ना.मा.प्र. महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : 5
अ) ना.मा.प्र. महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : 6
अ) ना.मा.प्र. महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 7
अ) SC महिला
ब) ना.मा.प्र.
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : 8
अ) SC
ब) ना.मा.प्र. महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 9
अ) ना.मा.प्र.
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 10
अ) SC महिला
ब) ना.मा.प्र.
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : 11
अ) SC
ब) ना.मा.प्र. महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 12
अ) ना.मा.प्र.महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 13
अ) ना.मा.प्र.
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक: 14
अ) SC महिला
ब) ना.मा.प्र.
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 15
अ) ना.मा.प्र
ब) ना.मा.प्र. महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 16
अ) ना.मा.प्र
ब) ना.मा.प्र. महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 17
अ) ना.मा.प्र
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 18
अ) SC
ब) ना.मा.प्र. महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 19
अ) SC महिला
ब) ना.मा.प्र
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: 20
अ) SC महिला
ब) ST
क) सर्वसाधारण
महत्वाच्या बातम्या:
























