एक्स्प्लोर
तासगाव शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनात विद्यार्थिनीची आत्महत्या
प्रणाली पाटील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.

सांगली : सांगलीत तासगावमधील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रणाली प्रकाश पाटील असं तरुणीचं नाव असून ती वाळवा तालुक्यातील साखराळे गावची आहे. प्रणाली शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. रविवारी सकाळी रुममध्ये कोणी नसल्याचं पाहून तिने पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रणालीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनी आणि प्रणालीच्या रुममेट्स, शिक्षिका यांच्याकडे अधिक चौकशी करत आहेत.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















