एक्स्प्लोर

गाढवांवरुन वाळू तस्करी, प्रशासन चक्रावले !

गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसायची आणि गाढवांच्या साहाय्याने नदीपासून दूर अंतरावर वाहून नेत त्याचे ढिगारे केले जायचे. तिथून वाहनांच्या साहाय्याने वाळू वाहतूक करून जास्त भावाने ती विक्री केली जायची.

परभणी : वाळू माफियांनी राज्यातील नद्यांची अक्षरश चाळणी केली आहे. वाळू चोरण्याच्या ना ना क्लुप्त्या वाळू माफियांनी आजपर्यंत वापरल्या आहेत. मात्र आता वाळू माफियांनी नामी शक्कल लढवत वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर सुरु केला आहे. यामुळे प्रत्यक्ष कारवाई करताना महसूल प्रशासन चक्रावून गेलं आहे. वाळू माफियांनी बोटी, जेसीबी, ट्रॅक्टर आदी वाहनांवर कारवाईचे प्रमाण वाढल्यानंतर प्रशासनाच्या भीतीने गाढवांद्वारे वाळू तस्करीचा नवा फंडा अमलात आणला आहे. गोदावरी, दुधना आणि पूर्णा या तीन महत्वाच्या नद्यांनी परभणी जिल्ह्याला समृद्ध बनवलं. मात्र आज वाळूच्या वाढत्या तस्करीने या नद्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. उच्च न्यायालयाने कडक निर्बंध घातल्याने वाळू ठेक्यांचे लिलाव अद्याप झाले नाहीत. याचाच फायदा घेत नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. 58  गाढवं पकडून कोंडवाड्यात ठेवली वाळूच्या वाहतुकीसाठी टीप्पर, ट्रॅक्टर, जेसीबी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु महसूलचे पथक या वाहनांवर कारवाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाळू माफियांनी नामी शक्कल लढवत वाळूच्या वाहतुकीसाठी गाढवांचा वापर वाढविला. गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसायची आणि गाढवांच्या साहाय्याने नदीपासून दूर अंतरावर वाहून नेत त्याचे ढिगारे केले जायचे. तिथून वाहनांच्या साहाय्याने वाळू वाहतूक करून जास्त भावाने ती विक्री केली जायची. दिवसाढवळ्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरुन नेली जात असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने तहसीलदारांनी या गाढवांवर कारवाई केली आहे. गंगाखेडमध्ये 26 तर सोनपेठ मध्ये 32 गाढवं पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आलं आहे. या कारवाई नंतर गंगाखेडमधील गाढव मालक मात्र फरार आहेत. मात्र वाळू माफियांनी लढवलेल्या या नामी शकलीमुळे प्रशासनाचे अधिकारी चक्रावून गेले आहेत. गाढवांवरुन वाळू तस्करी, प्रशासन चक्रावले ! नद्यांची चाळणी झाली, उपसा कायमचा बंद करण्याची मागणी परभणी जिल्ह्यात एकूण 65 पेक्षा जास्त वाळूचे ठेके आहेत. मात्र उच्च न्यायालयाने हे देताना कडक निर्बंध घालून दिले आहेत. यामुळे अद्याप या ठेक्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात वाळूची टंचाई आहे. सध्या केवळ शासकीय कामांसाठीच काही ठिकाणाहून वाळू उपसण्याचे आदेश आहेत. मात्र  वाळू माफियांनी जिल्हाभरातील अनेक ठेक्यांमधून अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. ज्यावर प्रशासन कारवाई करत असलं तरीही ना ना प्रकारे वाळूचा उपसा सुरूच असल्याने नद्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. नदीकाठच्या गावातील पाणी पातळीवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे वाळू उपसा कायमचा बंद करण्याची मागणी गावकरी करत आहेत. प्रशासन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या पोलीस ठाणे, तहसीलमध्ये लावून ठेवतात. त्या मालकांवर गुन्हे दाखल करुन दंड वसूल करुन गाड्या सोडल्या जातात. मात्र आता ही गाढवं पकडून त्यांना किती दिवस कोंडून ठेवणार? हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर या गाढवांना खाऊ-पिऊ घालायचे काम देखील प्रशासनाला करावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Mira Bhayander Municipal Corporation Priyanka Rajput: पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी
पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Embed widget