एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना, मृतांचा आकडा 20 वर

Shahapur Accident : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Samruddhi Mahamarg Thane Accident : समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर (Thane) येथे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच इंजिनियरसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

समृद्धी महामार्ग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर

पहाटेपर्यंत 17 जणांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर गर्डरखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. तर काही गंभीर जखमींना शहापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गर्डरखाली दोन मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. एनडीआरएफचे अधिकारी सारंग कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून सांगितल्याप्रमाणे 28 जणं इथे उपस्थित होते. त्यापैकी 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे.

गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब कोसळून अपघात

शाहपूर सरलांबे येथे गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळून हा भीषण अपघात घडला. या अपघातात इंजिनिअर आणि मजूरांना जीव गमवावा लागला आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु असताना सोमवारी रात्रीच्या वेळी ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे. 

गर्डर कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल

नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लाँच करणाऱ्या व्ही एस एल कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 304 अ, 337, 338 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळं कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी असलेल्या प्रेम प्रकाश साव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पालकमंत्री शंभुराजे देसाई काय म्हणाले?

पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शंभुराजे देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी असून त्यांची तब्येत स्थिर आहे, त्यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी शासनाकडून हलवले जाईल. अपघाताचे कारण नेमकं काय हे चौकशीनंतर कळेल. 20 मृतदेहांच्या कागदपत्रांची पुर्तता करत आम्ही पाठवण्याचे बंदोबस्त करत आहोत. चौकशीत प्राथमिक गोष्टी समोर येत नाही तोपर्यंत हे का घडलं हे सांगणं कठीण आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget