Rupali Thombare Patil on Indurikar Maharaj: सोशल मीडियाच्या विकृत छपरींकडे लक्ष देऊ नका, फेटा खाली उतरवायचा नाही; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
Rupali Thombare Patil on Indurikar Maharaj: कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सोशल मिडीयावरील टीकांमुळे कीर्तन सोडण्याचे संकेत दिले आहेत.

Rupali Thombare Patil on Indurikar Maharaj: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर, साधेपणाने विवाहसोहळे करावेत असा उपदेश करणारे इंदुरीकर महाराज मात्र आपल्या मुलीचा साखरपुडा भव्य पद्धतीने करतात, अशा आशयाच्या टीका सोशल मीडियावरून जोरदारपणे करण्यात आल्या. या तीव्र व्यक्तिगत टीकेचा परिणाम म्हणून इंदुरीकर महाराज मानसिक तणाव अनुभवत असल्याचे दिसून आले. अखेर एका कीर्तनात त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल खंत व्यक्त करत कीर्तन सोडण्याचा निर्णय जाहीर केला. यासंबंधीचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झालात, साहजिकच होणार. पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या, कामाने सिद्ध आहात. या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत, यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन आणि भजनातून समाजातील माता, भगिनी, बंधूंसाठी अत्यंत मौल्यवान कार्य केलं आहे. अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केलं आहे. त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.
Rupali Thombare Patil on Indurikar Maharaj: फेटा खाली ठेवायचा नाही
रुपाली ठोंबरे पाटील पुढे म्हणाल्या की, तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री, पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे, त्यांना सदबुद्धी, चांगले विचार, चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण? तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे. तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे. आमच्या भगिनींबद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी, विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सोंग घेण्याकडे त्या वेड्याचे सोंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत. त्यांची विकृती ठेचून काढू अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.
Indurikar Maharaj: नेमकं काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?
इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात म्हटले होते की, लोक आता इतके खालच्या पातळीवर गेले की माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट्स करत आहेत. तुम्ही मला शिव्या द्या, मला घोडे लावा, पण माझ्या लेकरांवर बोलू नका. आयुष्यभर लोकांची सेवा केली, चांगलं केलं पण आता वैयक्तिक आयुष्यावर येऊन ठेपलंय. 31 वर्ष मी कीर्तन केलं, लोकांना मार्गदर्शन केलं, पण आता कंटाळलो आहे. मी दोन-तीन दिवसात मोठा निर्णय घेणार आहे. माझ्यात अजून उत्तर द्यायची ताकद आहे, पण आता हे सगळं माझ्या घरा पर्यंत पोहचलं आहे. मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला, पण मला आता शांतता हवी आहे. माझ्या लेकरांच्या कपड्यांवर बोलणाऱ्यांना तरी लाज वाटली पाहिजे. आता मी काही दिवसांत निर्णय घेईन, असे त्यांनी म्हटले होते.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























