एक्स्प्लोर
'इंग्लिशमध्ये सांगू काय' म्हणणाऱ्या 'आर्ची'ला इंग्रजीत किती मार्क मिळाले, 82 टक्के घेत रिंकू बारावी पास
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे.

मुंबई : पुणे बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या परीक्षेत सैराटच्या आर्चीला अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूला 650 पैकी 533 गुण मिळाले आहेत. मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंलिशमध्ये सांगू काय असं म्हणणाऱ्या आर्चीला बारावी परीक्षेत इंग्रजी विषयात कमी म्हणजे 54 मार्क मिळाले आहेत. रिंकू राजगुरूला मराठीत 86, भूगोल विषयात तब्बल 98, इतिहास विषयात 86, राज्यशास्त्र विषयात 83, अर्थशास्त्र विषयात 77 तर पर्यावरण स्टडी विषयात 49 गुण मिळाले आहेत. तिला एकूण सात विषयात 650 पैकी 533 गुण मिळाले आहेत. तिला सरासरी 82 टक्के मार्क मिळाले आहेत.
बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस काॅन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल. कोकण अव्वल, नागपूर तळाला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. यात कोकण विभागाचा सर्वाधिक 93.23 टक्के निकाल लागला आहे. तर 82.81 टक्क्यांसह नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. यंदाही मुलींची बाजी निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 90.25 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 82.40 टक्के आहे. यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 7.85 टक्क्यांनी जास्त आहे. संपूर्ण राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुंबईच्या सोफिया काॅलेजची विद्यार्थिनी निशीका ही iPad वर परीक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी ठरली होती. ती 73 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे. बारावीचा विभागनिहाय निकाल पुणे - 87.88 टक्के मुंबई - 83.85 टक्के नागपूर - 82.81 टक्के अमरावती - 87 टक्के लातूर - 86.08 टक्के नाशिक - 84.77 टक्के औरंगाबाद - 87.29 टक्के कोल्हापूर - 87.12 टक्के कोकण - 93.23टक्के शाखानिहाय निकाल कला - 76.45 टक्के वाणिज्य - 88.28 टक्के विज्ञान - 92.60 टक्के बारावी निकालाची वैशिष्ट्ये * कोकण अव्वल (93.23 टक्के), नागपूर तळाला (82.81) * 90.25 टक्क्यांसह विद्यार्थिनींची बाजी (यंदा 7.85 टक्के जास्त निकाल) * राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत घट * iPad वर परीक्षा देणाऱ्या मुंबईतील दिव्यांग विद्यार्थिनीला 73 टक्के * दिव्यांगांच्या निकालात यंदा 1.18 टक्क्यांनी वाढ (यावर्षी 92.60 टक्के निकाल) कसा पाहाल निकाल? बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. याठिकाणी पाहता येणार निकाल? www.mahresult.nic.in संबंधित बातम्या
बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस काॅन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल. कोकण अव्वल, नागपूर तळाला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. यात कोकण विभागाचा सर्वाधिक 93.23 टक्के निकाल लागला आहे. तर 82.81 टक्क्यांसह नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. यंदाही मुलींची बाजी निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 90.25 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 82.40 टक्के आहे. यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 7.85 टक्क्यांनी जास्त आहे. संपूर्ण राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुंबईच्या सोफिया काॅलेजची विद्यार्थिनी निशीका ही iPad वर परीक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी ठरली होती. ती 73 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे. बारावीचा विभागनिहाय निकाल पुणे - 87.88 टक्के मुंबई - 83.85 टक्के नागपूर - 82.81 टक्के अमरावती - 87 टक्के लातूर - 86.08 टक्के नाशिक - 84.77 टक्के औरंगाबाद - 87.29 टक्के कोल्हापूर - 87.12 टक्के कोकण - 93.23टक्के शाखानिहाय निकाल कला - 76.45 टक्के वाणिज्य - 88.28 टक्के विज्ञान - 92.60 टक्के बारावी निकालाची वैशिष्ट्ये * कोकण अव्वल (93.23 टक्के), नागपूर तळाला (82.81) * 90.25 टक्क्यांसह विद्यार्थिनींची बाजी (यंदा 7.85 टक्के जास्त निकाल) * राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत घट * iPad वर परीक्षा देणाऱ्या मुंबईतील दिव्यांग विद्यार्थिनीला 73 टक्के * दिव्यांगांच्या निकालात यंदा 1.18 टक्क्यांनी वाढ (यावर्षी 92.60 टक्के निकाल) कसा पाहाल निकाल? बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. याठिकाणी पाहता येणार निकाल? www.mahresult.nic.in संबंधित बातम्या VIDEO | 'कागर' सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरु सोबत गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी
रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचं नाव जाहीर!
व्हायरल सत्य : धबधब्याजवळ नाचताना रिंकू जोरदार पडली?
आणखी वाचा























