Sahitya Akademi Award 2022: प्रवीण बांदेकर यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर, 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीसाठी करण्यात आला गौरव
Sahitya Akademi Award 2022: मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार आणि कवी प्रवीण बांदेकर यांना साहित्य विश्वातील मानाचा समजाला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
Sahitya Akademi Award 2022: मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार आणि कवी प्रवीण बांदेकर यांना साहित्य विश्वातील मानाचा समजाला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला मराठी भाषेसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा झाली.
11 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीतील कमानी सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 23 भारतीय भाषांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये सात काव्यसंग्रह, सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, दोन साहित्यिक समीक्षा, तीन नाटके, एक आत्मचरित्रात्मक निबंध, एक संक्षिप्त सिंधी साहित्यिक इतिहास आणि एक लेख संग्रह यांचा समावेश आहे.
कोण आहेत प्रवीण बांदेकर?
प्रवीण दशरथ बांदेकर हे मराठी साहित्यिक असून त्यांनी ’नवाक्षर दर्शन’ या वाङ्मयीन मराठी नियतकालिकाचे ते संंस्थापक देखील आहेत. येरू म्हणे (कविता संग्रह), खेळखंडोबाच्या नावानं (दीर्घ कविता), 2005 3. घुंगूरकाठी (ललित लेख), 2009 4. चाळेगत (कादंबरी), 2009 5. उजव्या सोंडेच्या बाहुल्या (कादंबरी), 2016 6. इंडियन ॲनिमल फार्म (कादंबरी), 2019 7. चिंटू चुळबुळे (बालसाहित्य), 1993 8. हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध (ललित), 2019 9. चिनभिन (कविता संग्रह) 2021 ही आतापर्यंत त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा इंदिरा संत पुरस्कार (येरू म्हणे), को.म.सा.प.चा आरती प्रभू पुरस्कार (येरू म्हणे ), अनुष्टुभ प्रतिष्ठान, मुंबईचा विभावरी पाटील पुरस्कार, (चाळेगत), भैरू रतन दमाणी पुरस्कार, सोलापूर (चाळेगत), विखे पाटील पुरस्कार, प्रवरानगर, (उजव्या सोंडेच्या बाहुल्या) मराठवाडा साहित्य परिषदेचा बी. रघुनाथ कादंबरी पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार, अमेरिका, आचार्य अत्रे पुरस्कार, बेळगाव, पाॅप्युलर प्रकाशनचा गंगाधर गाडगीळ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान, साहित्य अकादमी पुरस्कार 2022 हे 23 भारतीय भाषांसाठी जाहीर करण्यात आले आहेत. ज्यात 7 काव्यसंग्रह, 6 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 2 साहित्यिक समीक्षा, 3 नाटके, 1 आत्मचरित्रात्मक निबंध, 1 संक्षिप्त साहित्यिक इतिहास आणि 1 लेख संग्रह यांचा समावेश आहे. 23 भारतीय भाषांच्या ज्युरी समितीने या पुरस्कारांची शिफारस केली होती आणि आज साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांना मान्यता देण्यात आली.