एक्स्प्लोर
एकतेच्या मोठ्या आवाजाने समाजकंटकांच्या कानठळ्या बसतील : विश्वास नांगरे-पाटील
कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर गढूळ झालेलं सामाजिक वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी सांगलीत आज सद्भवना एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला सांगलीचे जिल्हाधिकारी तसंच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते.

सांगली : एकतेच्या मोठ्या आवाजाने समाजकंटकांच्या कानठळ्या बसतील, त्यामुळे यापुढे ते समाजात अशांतता पसरवणार नाहीत अशी आशा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची व्यक्त केली. कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर गढूळ झालेलं सामाजिक वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी सांगलीत आज सद्भवना एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला सांगलीचे जिल्हाधिकारी तसंच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या रॅलीत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सहभाग नोंदवत समाजात एकोपा टिकून राहावा यासाठी सद्भावना रॅलीतून समाजात एकोप्याचा संदेश जाण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी जिल्हाधिकारी आणि विश्वास-नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.
या रॅलीला जिल्ह्यातील नागरिकांसह शाळकरी मुलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. रॅलीच्या माध्यमातून समाजात एकोपा जपण्याचा संदेश देण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
सिंधुदुर्ग
विश्व
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
