एक्स्प्लोर
कुणाला मातीत घालण्यासाठी संघटना नाही: सदाभाऊ खोत
माझ्या संघटनेच्या बिल्ला हा माझ्या संघटनेतील कार्यकर्त्याची कवचकुंडले असतील : सदाभाऊ खोत
![कुणाला मातीत घालण्यासाठी संघटना नाही: सदाभाऊ खोत Sadabhau Khot To Inaugurate His New Political Party कुणाला मातीत घालण्यासाठी संघटना नाही: सदाभाऊ खोत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/01162554/Sadabhau_Khot.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली: कुणाला मातीत घालण्यासाठी मी नवीन संघटना स्थापन करत नाही, तर मातीत घाम गाळणाऱ्या माणसाला न्याय देण्यासाठी नवी संघटना उभारत आहे, असं कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.
घटस्थापनेनिमित्त आज कोल्हापुरात खोत यांच्या संघटनेचा नारळ फुटतोय, या पार्श्वभूमीवर सदाभाऊ काल सांगलीत बोलत होते.
माझ्या संघटनेच्या बिल्ला हा माझ्या संघटनेतील कार्यकर्त्याची कवचकुंडले असतील. ही कवचकुंडले कुणीही अगदी मी ही हिरावून घेऊ शकणार नाही. त्या बिल्ल्यावर अधिकार हा त्या कार्यकर्त्याचाच असेल असं खोत म्हणाले.
स्वाभिमानीतून हकालपट्टी
गेल्या महिन्यात सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत चार सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी याबाबत पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊंच्या हकालपट्टीची घोषणा केली.
“सदाभाऊ यांच्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित झाली आहे. शिवाय, त्यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे.”, असे दशरथ सावंत म्हणाले.
संबंधित बातम्या
शेतकरी नेत्यांची जोडी फुटली, सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी
'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)