एक्स्प्लोर
डोंजेकरांच्या बोलिंगसमोर सचिनची तारांबळ!
सचिनने गावातील विकासकामांची पाहणी केली. गावकऱ्यांशी गप्पा मारुन, सचिनने थेट गावातील मुलांशी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

उस्मानाबाद: दत्तक घेतलेल्या डोंजे गावात आज भारतरत्न सचिन तेंडुलकरने हजेरी लावली. काही वेळापूर्वी हेलिकॉप्टरनं सचिन तेंडुलकर या गावात दाखल झाला. गावकऱ्यांनी सचिनचं जंगी स्वागत केलं. सचिनच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी चक्क गुढ्या उभ्या केल्या आहेत. इतकंच नाहीतर महिलांनी रस्त्यावर रांगोळ्या काढून, सचिनचं औक्षण करुन, त्याचं स्वागत केलं. सचिनने गावातील विकासकामांची पाहणी केली. गावकऱ्यांशी गप्पा मारुन, सचिनने थेट गावातील मुलांशी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी डोंजेकरांनी सचिनला गोलंदाजी केली. बॅटिंगला समोर क्रिकेटचा देव पाहून, डोंजेरकरांची बोलिंग करताना चांगलीच तारांबळ उडाली. सचिनला गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना धडकी भरत असे. मात्र डोंजेकरांची खेळता न येणारी गोलंदाजी पाहून, सचिनही गडबडला. सचिनला गोलंदाजी करण्यास उत्सुक असलेल्या गोलंदाजांनी, कधी ऑफला मोठा वाईड, तर कधी लेग साईडला त्यापेक्षा मोठा वाईड टाकला. त्यामुळे सचिनच्या बॅटला बॉल काही लागला नाही. मात्र सचिनसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद गावकऱ्यांनी चांगलाच लुटला. पाहा व्हिडीओ डोंजा गाव दत्तक खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशमधील पुट्टमराजू कन्ड्रिगा गावाचा कायापालट केला. त्यानंतर गेल्या वर्षी सचिनने महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गाव दत्तक घेतलं. ही बातमी डोंजा गावात पोहोचताच एकच जल्लोष झाला होता. हलगीच्या तालावर गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. संबंधित बातम्या सचिन तेंडुलकरकडून उस्मानाबादेतील डोंजा गाव दत्तक सचिनने दत्तक घेतलेलं पहिलं गाव सचिनने दत्तक घेतलेल्या आंध्रातील गावाचा कायापालट
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























