एक्स्प्लोर

Rupali Chakankar : खरातसोबत अनेकांचे फोटो, फक्त महिला म्हणून आपल्यावर आरोप; राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया

Rupali Chakankar On Ashok Kharat : एखादा व्यक्ती पुढे जाऊन कसा वागेल याची माहिती आपल्याला नव्हती. खरात दाम्पत्याला गुरू मानल्याने त्याची पाद्यपूजा केली असल्याचं रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केलं. 

मुंबई : आपले जे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत ते पाच वर्षांपूर्वीचे आहेत, एखादा व्यक्ती पुढे जाऊन कसा वागेल याची माहिती आपल्याला कशी असेल. आपलं कुटुंब वारकरी संप्रदायाचं असल्याने अशोक खरातच्या (Ashok Kharat)  ट्रस्टशी आपण जोडलो गेलो, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतर माहिती नव्हती असं रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या. खरातच्या कोणत्याही कृत्याचं समर्थन करण्याचा प्रश्न नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल असंही त्या म्हणाल्या. रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

या प्रकरणात जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. यानंतर सविस्तरपणे पुराव्यासह लवकरच पत्रकार परिषद घेणार आहोत, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. 

Rupali Chakankar Ashok Kharat Case : पुढे जाऊन कसा वागेल याची माहिती नव्हती

अशोक खरातच्या ट्रस्टवरील संचालकपदाचा आपला कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपला आहे. आता जो पाद्यपूजेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाच वर्षांपूर्वीचा आहे असा दावा रुपाली चाकणकरांनी केला. त्या म्हणाल्या की, खरात पती पत्नीला गुरू मानलं. त्यामुळे ट्रस्टच्या ठिकाणी काही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरू मानल्याने आम्ही संपूर्ण कुटुंबासह हजेरी लावायचो. पाच सहा वर्षांपूर्वीचे व्हिडीओ समोर येत आहेत. त्यावेळी एखाद्याचं वैयक्तिक कृत्य किंवा इतर गोष्टी माहिती नव्हत्या, पुढे जाऊन तो व्यक्ती कसा वागेल याची माहिती नव्हती. त्यामुळे अशोक खरातच्या कृत्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं.

या प्रकरणी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिलं आहे. सुनेत्रा पवार यांचीही भेट घेऊन या प्रकरणाचा तपास पारदर्शक व्हावी अशी मागणी केली, असं रुपाली चाकणकरांनी सांगितलं. 

Rupali Chakankar On Resignation : महिला म्हणून आरोप

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. त्यामुळे खरातच्या ट्रस्टसोबत जोडले गेले. परंतु, खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागते, काय करते याची माहिती कशी असेल? माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरातसोबत आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले याचं वाईट वाटतंय."

Rupali Chakankar News :  त्या बातमीवर कार्यवाही केली

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "19 मार्च 2025 रोजी एका पत्रकाची बातमी आमच्याकडे आली होती. त्यावर आमच्या समुपदेशन खात्याने त्यांना पत्र लिहिलं होतं. तसंच आम्ही पोलीस अधीक्षकांनाही पत्र लिहून त्याची माहिती मागवली. परंतु, नंतर त्या पत्रकाने खुलासा केला की त्यांच्याकडे काहीही माहिती नाही. आता त्याचाच आधार घेऊन आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत."

काही दिवसांपूर्वी मला एका मुलीचा मेल आला. खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार केली होती. तोपर्यत खरातचं कुठेही नाव नव्हतं, परंतु त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं. त्यावर आम्ही कारवाई केली अशी माहिती रुपाली चाकणकरांनी दिली. 

Rupali Chakankar On Sushma Andhare : कायदेशीर नोटीस पाठवणार

वशीकरण विद्या शिकण्यासाठी चाकणकरांनी हाताची अनामिका कापून घेतल्याचा दावा काहीजणांनी केला होता. त्यावरही चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या की, 2 सप्टेंबर रोजीचा एक फोटो व्हायरल केला जात आहे. त्यावेळी माझ्या हाताला कोणतीही जखम नव्हती. परंतु सातत्याने खोटी माहिती दिली गेली. ही खोटी माहिती देणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार."

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Mumbai Protest Video Viral: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget