एक्स्प्लोर
25000पेक्षा जास्त देणगी दिल्यास शिर्डी संस्थानाकडून चादींच्या पादुका

शिर्डी: शिर्डीत साईबाबांच्या चरणी पंचवीस हजारापेक्षा जास्त देणगी देणार्या भक्तांना यापुढे चांदीच्या पादुका देण्यात येणार आहे. शिर्डी संस्थानानं आज हा निर्णय घेतला आहे. शिर्डी संस्थानाकडून वीस ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका देऊन भक्ताचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे. साईबाबाच्या चरणी दानामध्ये आलेल्या चांदीपासून या पादुका तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे 25 हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्ताला साई संस्थानाकडून चांदीच्या पादुका मिळणार आहे.
आणखी वाचा























