एक्स्प्लोर
Advertisement
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. पाकणी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो जीपनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या जीपला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले अक्कलकोटचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement