एक्स्प्लोर
मुंबईत रिलायन्सकडून गुजराती भाषेत वीज बिलं, मनसे आक्रमक
![मुंबईत रिलायन्सकडून गुजराती भाषेत वीज बिलं, मनसे आक्रमक Reliance Energy Printed Electricity Bills In Gujrati Language मुंबईत रिलायन्सकडून गुजराती भाषेत वीज बिलं, मनसे आक्रमक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/01171723/reliance.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रिलायन्स एनर्जीने आपल्या ग्राहकांना मुंबईत गुजराती भाषेत वीज बिल दिले आहेत. मुंबईच्या बोरीवली परिसरात असे बिल दिल्याचे आढळून आले आहे. त्यावर मनसेने अक्षेप घेतला आहे.
रिलायन्स एनर्जीने गुजराती भाषेत बिल दिल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उत्तर मुंबईतील मनसेचे प्रमुख नेते आणि पक्षाचे उपाध्यक्ष नयन कदम यांनी रिलायन्सच्या कार्यलायात जाऊन याबाबत जाब विचारला.
गुजरात किंवा चेन्नईत तुम्ही मराठीत वीज बिल द्याल का?, असा सवाल करत मनसे उपाध्यक्ष नयन कदम यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. रिलायन्स एनर्जीला दिलेल्या पत्रात ते म्हणाले, “गुजराती भाषेत बील देण्याची ही घटना चुकून घडली असल्यास, चूक लवकर दुरुस्त करावी. जर जाणीवपूर्वक भाषा वाद तुम्ही करत असाल, तर मनसेला आंदोलन करण्याकरिता भाग पाडू नये. महाराष्ट्रात मराठी सोडून इतर कोणत्याही प्रांतिक भाषेत वीज बिलं देऊ नये. अन्यथा, महाराष्ट्रात भाषिक वाद उसळल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी रिलायन्स एनर्जीची असेल.”
महापालिका निवडणुकीत मनसेला म्हणावं तसं यश मिळालं नाही. मात्र, मनसेने आपला मराठीचा मुद्दा सोडला नाही. पराभवानंतरही मनसे मराठीच्या मुद्द्यावर तितकीच आक्रमक होत असल्याचे दिसून येते आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची मनसेची भूमिका नयन कदम यांच्या पत्रामधूनही पुन्हा एकदा समोर आली आहे.
रिलायन्स एनर्जी वीज बिलं गुजराती भाषेत छापण्याचं बंद करते का आणि ते बंद न केल्यास मनसे कसा पवित्रा घेते, हे आगामी काळात कळेलच. पण रिलायन्स एनर्जीच्या या गुजराती भाषेत बिल छापण्याच्या उद्योगामुळे मुंबईतील मराठी माणसांमध्येही नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गुजराती बिलाचा फोटो :
![मुंबईत रिलायन्सकडून गुजराती भाषेत वीज बिलं, मनसे आक्रमक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/01171601/Nayan-kadam-580x395.jpg)
![मुंबईत रिलायन्सकडून गुजराती भाषेत वीज बिलं, मनसे आक्रमक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/01171509/Capture.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)