मुंबई- पुणे भागात लॉकडाऊनबाबतीत सवलती रद्द, वाढलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरवल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच पालन होत नसल्याचं पाहून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली आहे.

मुंबई : कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली आहे. अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे, असे प्रशासनाला निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 20 एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरवल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली. तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.
लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने 17 एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली आहे. ही दुरुस्ती मुंबई आणि पुण्यासाठी लागू असेल. म्हणजेच 17 एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात 17 एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.
ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल. फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील.
बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे. राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील. मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
- Attack on Doctors | आयएमएचे डॉक्टर 23 एप्रिलला काळा दिवस पाळणार!
- मुंबईतील झोपडपट्ट्यांना बिल्डर, आर्किटेक्ट जबाबदार; रतन टाटा यांची टीका
- Coronavirus | राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या






















