एक्स्प्लोर

Recruitment : राज्य शासनाच्या 75 हजार पद भरतीतला मोठा अडथळा दूर, भरतीचा मार्ग मोकळा 

राज्य शासनाच्या (State Government) 29 विभागातील 75 हजार पद भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Recruitment : राज्य शासनाच्या (State Government) 29 विभागातील 75 हजार पद भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारनं काही नियम बाजूला ठेवत या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सरकारनं ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झाला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्याची मुभा दिली आहे. ज्या विभागाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभागांमधील गट-अ आणि गट-ब तसेच गट ब मधील वाहनचालक आणि गट-ब संवर्गातील पदे वगळून सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा दिली आहे.

राज्य सेवा परीक्षेअंतर्गत 623 पदे भरली जाणार 

दरम्यान, सरकारनं मंजूर आकृतिबंध बाजूला ठेवून नोकर भरती करण्याची भूमिका घेतली आहे. ही शिथिलता पुढची वर्षभर लागू असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षा 2022 अंतर्गत 623 पदे भरली जाणार आहेत. 623 पदांचा तपशील एमपीएससीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. राज्यसेवा परीक्षा 2022 करिता 11 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रस्तुत परीक्षेसाठी काही नवीन संवर्गातील 432 पदांचे अतिरिक्त मागणी पत्र शासनाकडून प्राप्त झाले होते. राज्यसेवा परीक्षा 2022 करिता 161 पदे तसेच अतिरिक्त 462 मध्ये विचारात घेऊन परीक्षामधून विविध संवर्गातील 623 पदांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. 

यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त,साहाय्यक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी,शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, तहसीलदार अशाप्रकारची गट अ आणि गट ब संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी वयोमर्यादा 1 एप्रिल 2023 रोजी गणण्यात येईल तर इतर सर्व पदांकरिता वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद 1 सप्टेंबर 2022 गणण्यात येईल.आधी महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2022 ही 161 पदांसाठी घेण्यात येणार होती. आता यामध्ये 432 पदे वाढवली आहेत. त्यामळं आता एकूण 623 पदांची भरती या परीक्षेतून होणार आहे. डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 डिसेंबरमध्ये होणार आहे. 

कोरोनाच्या संकटामुळं गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरती होऊ शकली नाही. त्यामुळं देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळं येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होणार आहे. मात्र, गेल्या काळात नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्त निर्णय होताना पाहायला मिळाले आहेत. आता पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Recruitment: राज्यातील 75 हजार जागांची नोकर भरती नेमकी कशी असेल? कोणत्या खात्यात किती जागा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte Holi : रंग लावले, पप्पीचा प्रयत्न, सदावर्ते कपलची हटके होळी, FULL VIDEORaj Thackeray Holi : राज ठाकरेंची धुळवड,'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं FULL VIDEOABP Majha Headlines : 01 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Embed widget