Ravish Kumar on Marathi: हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी पर्यायी पद्धतीने शिकवली पाहिजे, मराठी शब्द तांत्रिकदृष्ट्या अचूक; गरळ ओकणाऱ्या 'दुबे' विकृतीवर रविश कुमारांची चपराक
Ravish Kumar on Marathi: भाषेच्या नावाखाली का लढायचे किंवा इतरांना का लढवायचे. हिंदी हात जोडण्याची भाषा आहे. हाताने लढण्यासाठी नाही. भाजपने हे खूप समजून घेतले पाहिजे, असे रविश कुमार यांनी म्हटलं आहे.

Ravish Kumar on Marathi: मायबोली मराठीचा महाराष्ट्रामध्ये आग्रह धरला जात असताना हिंदी भाषिक राज्यातील नेत्यांकडून महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली जात आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे आघाडीवर आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विरोधात आणि ठाकरे बंधू विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर पटक पटक के मारू असं म्हणत आव्हान सुद्धा देत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता जेष्ठ पत्रकार रविश कुमार यांच्या पोस्टने हिंदी भाषिक राज्यातील सणसणीत चपराक दिली आहे.
हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी शिकवली गेली पाहिजे
रविश कुमार यांनी मराठी भाषेचा समर्थन करताना थेट हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी शिकवली गेली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. रविश कुमार यांनी ट्विट करत मराठी हिंदी वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठी भाषा ही तांत्रिकदृष्ट्या अचूक असल्याचे सांगत हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी भाषा पर्यायी पद्धतीने शिकवली पाहिजे, असं मत मांडलं आहे. त्यामुळे एक प्रकारे मराठीवरून राजकारण करू पाहणाऱ्यांना रविश कुमार यांनी डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे.
हिन्दी प्रदेशों में मराठी का वैकल्पिक शिक्षण होना चाहिए, इससे हिन्दी का विस्तार होगा। उसके शब्द परिवार का संसार बड़ा होगा। कोई ज़रूरी नहीं कि स्कूल के कोर्स पर ही सारा भार लाद दिया जाए, लोग भी आगे आएँ और मराठी सीखें। मराठी के कई शब्द तकनीकी रुप से कहीं ज़्यादा सटीक हैं। अवधारणाओं…
— ravish kumar (@ravish_journo) July 18, 2025
काय म्हटलं आहे रविश कुमार यांनी?
हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी भाषा पर्यायी पद्धतीने शिकवली पाहिजे, यामुळे हिंदीचा विस्तार होईल. त्याच्या शब्द कुटुंबाचे जग विस्तारेल. शालेय अभ्यासक्रमावर संपूर्ण भार टाकण्याची गरज नाही, लोकांनी पुढे येऊन मराठी शिकले पाहिजे. बरेच मराठी शब्द तांत्रिकदृष्ट्या बरेच अचूक आहेत. ते संकल्पना योग्यरित्या व्यक्त करतात. असो, महाराष्ट्रातील लोक पुरेसे हिंदी बोलतात. त्यांना हिंदीचा तिटकारा नाही, हिंदीला त्यांच्या भूमीपासून मोठे आकाश मिळाले आहे. तिथे हिंदी सक्तीचे करण्याचे राजकारण करण्याची गरज नव्हती. दक्षिणेकडील मित्र राष्ट्रांना हिंदीच्या बाजूने भाषणे देण्यास भाग पाडल्याने काहीही होणार नाही आणि हिंदीमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या नावाखाली दहा कोटी खर्च करून हिंदीचा फायदा होणार नाही. मराठी ही एक समृद्ध आणि मजबूत भाषा आहे. धोरणे आणि बहुमताच्या आधारे तिच्याशी छेडछाड करू नये. असे केल्याने भाषांवरून संघर्ष वाढतात. भाषेच्या नावाखाली का लढायचे किंवा इतरांना का लढवायचे. त्या राजकारणाचा परिणाम सर्वांनी पाहिला आहे. हिंदी ही हात जोडण्याची भाषा आहे. हाताने लढण्यासाठी नाही. भाजपने हे खूप समजून घेतले पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या
























