Ravindra Varma : ठाण्यातील 'गद्दार' रवींद्र वर्माला तीन दिवसांची पोलिस कोठडी, हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला दिली लष्कराची गुप्त माहिती
Thane Ravindra Varma Honey Trap : ठाण्यातील रवींद्र मुरलीधर वर्माने पाकिस्तानमधील मुलींना भारतातील 14 पाणबुड्या, जहाज आणि बेटांची माहिती पुरवल्याचा आरोप आहे.

ठाणे : पाकिस्तानशी हेरगिरी प्रकरणात ठाण्यातील कळव्याच्या रवींद्र वर्माला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने रवी वर्माला 5 जूनपर्यंत कोठडी सुनावली. रवी वर्माने देशासोबत गद्दारी का केली, पैशासाठी की त्यालाही हनीट्रॅपच्या माध्यमातून अमिष दाखवण्यात आलं याचा तपास एटीएस अधिकारी आहेत.
रवींद्र मुरलीधर वर्मा याच्याकडून मुंबईतील नेव्हल डाँकच्या ठिकाणची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पाठवल्याचं उघडकीस आलं आहे. संवेदनशील ठिकाणचे अनेक नकाशे, आराखडे फेसबुकच्या माध्यमातून गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या एजंटला पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
Thane Ravindra Varma Honey Trap : रहनी ट्रॅपमध्ये अडकून माहिती पुरवली
रवींद्र वर्मा याने फेसबुक चार्टच्या माध्यमातून बनावट मुलींना भारतातील 14 पाणबुड्या, जहाज आणि बेटांची माहिती पुरवली होती. आरोपी रवींद्र मुरलीधर वर्मा याने हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला ही माहिती पुरवली असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, आरोपी हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्हच्या संपर्कात होता. रवींद्र वर्मावर केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेली संवेदनशील आणि गोपनीय माहिती सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत शेअर केल्याचा आरोप आहे.
Thane Ravindra Varma : सरकारी वकिलाचा युक्तीवाद -
आरोपी वर्माकडे अनेक मोबाईल सिम कार्ड सापडले आहेत. व्हॉईस मेसेजसंदर्भात आरोपीने अद्याप खुलासा केला नाही. रवींद्र वर्मा ज्या 'सर' नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याचं नाव सिंगल असल्याचं उघड झालं आहे. आरोपी रवींद्र वर्मा महत्त्वाची माहिती लपवतोय. आरोपीच्या डायरीत देशाविरोधातील काही गोष्टींचा उल्लेख आहे.
आरोपीच्या वकिलाचा युक्तीवाद -
रवींद्र वर्मा पहिल्या दिवसापासून तपासात सहकार्य करत आहे. रवींद्रने पाकिस्तानला कुठलेही नकाशे दिले नाहीत. रवींद्रला कुठलीही नोटीस न देता अटक करण्यात आली. माझा अशिलाकडे निळ्या रंगाची डायरी सापडली आहे. त्यात उद्याच्या कामाबाबत लिहिले असायचे. इतर देशविरोधी कारवाईबात काही नाही. पोलिसांना आरोपीकडे कोणतेही सिमकार्ड सापडलेले नाही. इतर कोणाकडे काही सापडले असेल तर माहित नाही. पोलिसांबाबत आरोपीच्या मनात भीती आहे. त्याने देशविरोधी कारवाई केलेली नाही. सर नावाच्या व्यक्तीबाबत आम्हाला काही माहीत नाही. हनीट्रॅपमध्येच माझा हशीलाला अडकवण्यात आलं आहे. प्रिती नावाच्या त्या तरुणीने कॉलेज प्रोजेक्टच्या नावाखाली माहिती मागितली. मात्र त्यात काही महत्त्वाचं नाही. जी माहिती देण्यात आली ती गुगलवरही उपलब्ध आहे.
ATS Action On Ravindra Varma Thane : ठाण्यात एटीएसची छापेमारी
रवींद्र वर्माच्या अटकेनंतर एटीसने ठाण्यात पडघ्यासह पंधरा ठिकाणी छापेमारी केली आहे. पाकिस्तानी हेर रवीद्र वर्माच्या अटकेनंतर एटीएसकडून ठाण्यात तपासाला वेग आला आहे. या छापेमारीत 200हून अधिक पोलीस सहभागी होते.
ही बातमी वाचा:























