एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू असून कालच आमदार बच्चू कडू यांच्याशी याबाबत चर्चा झाली. अजून काही घटक तिसऱ्या आघाडीसाठी आग्रही असल्यासही रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज (6 जुलै) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत म्हटलं की, जरी लोकसभा निवडणूक आपण हरलो असलो, तरी जनतेच्या मनात आपण जिंकलेलो आहोत. आपल्याला अडीच लाख मत पडली आहेत. प्रतापराव जाधव हे कागदावर जरी जिंकले असले तरी ते जनतेच्या मनातून हरले आहेत, जनतेचा कौल आपल्या सोबत असल्याने आता आपल्याला पराभवाला खचून न जाता बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढायची आहे. आणि उद्यापासूनच आपल्याला विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागायचं आहे, असे आवाहन केले. 

स्वाभिमानी सोडली आहे का? तुपकर काय म्हणाले?

रविकांत तुपकर यांनी बुलढाणामध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटले आहे. आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नांवर लढणार असून लवकरच पुण्यात कार्यकारिणीची बैठक होईल, यामध्ये राज्यातील कोणत्या जागा लढायच्या याबाबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही आघाडीत जाण्याचा प्रश्न नाही, आम्ही स्वतंत्र लढत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. स्वाभिमानी सोडली आहे का? या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढत असल्याचे ते म्हणाले.

राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू असून कालच आमदार बच्चू कडू यांच्याशी याबाबत चर्चा झाली. अजून काही घटक तिसऱ्या आघाडीसाठी आग्रही असल्यासही रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की मला उठलं, सुटलं नोटीस पाठवतात आणि पुण्याला हजर व्हा म्हणतात. मी काय दरोडा टाकला आहे का? अशी विचारणा तुपकर यांनी केली. 

माझ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत आले

ते म्हणाले की, मी या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष असूनही पक्षाविषयी जास्त मत घेतली. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यांनी विचार करावा. इमानदारीने वागत असल्याने गेल्या 22 वर्षांपासून माझ्यासोबत लोकं टिकून असल्याचे म्हणत एक प्रकारे राजू शेट्टी यांना टोला लगावला. मी जर लोकसभा निवडणूक लढवली नसती, तर निवडणूक हिंदू मुस्लिम झाली असती. माझ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीत आले. आता अर्थसंकल्पात आले. त्यामुळे चुका दुरुस्त करून आपल्याला पुढे जायचं असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Poharadevi Narendra Modi Welcome Prepration : पंतप्रधान वाशिम दौऱ्यावर; सभास्थळी जोरदार तयारीAmravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्जTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaPM Narendra Modi Thane Daura : पंतप्रधान मोदींच्यादौऱ्यासाठी ठाण्यात रस्त्याचं डीप क्लिनिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
Ajit Pawar: प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
Embed widget