एक्स्प्लोर

Ratan Tata Death: PM मोदींनी टाटा घराण्यातील 'त्या' व्यक्तीशी फोनवरुन साधला संवाद, अंत्यसंस्कारासाठी सरकारच्यावतीने अमित शाह मुंबईत येणार

Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. रतन टाटा यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Ratan Tata Death: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे वयाच्या 86 वर्षी निधन झालं. काल (बुधवारी) रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (गुरूवारी) दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती अशी रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख होती. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. रतन टाटा यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी फोनवरून बोलून संवेदना व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भारत सरकारच्या वतीने रतन टाटा यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.

पीएम मोदींनी नोएल टाटा यांच्याशी साधला संवाद

रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून नोएल टाटा यांच्याशी बोलून संवेदना व्यक्त केल्या आहेत, पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी लाओसला रवाना झाले आहेत, त्यामुळे ते रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी फोनवरून नोएल टाटा यांच्याशी संवाद साधला, तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भारत सरकारच्या वतीने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. यासंबधीची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

रतन टाटा यांचा मृत्यू कशामुळे?

रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीड कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांना सोमवारी (7 ऑक्टोबर) रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

रतन टाटा यांची कारकीर्द-

- जन्म - 28 डिसेंबर 1937, वय 86 वर्ष

- 1961-62 टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू

1991 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं

- चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली 

- 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली (रतन टाटांचं स्वप्न पूर्ण)

- एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली

- 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली

- 2012 मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला

- मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी

- नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन

- रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ustad Zakir Hussain Demise : जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधनCabinet Expansion महायुती सरकारचं नवं मंत्रिमंडळ, अनेक इच्छुक नेते वेटिंग लिस्टवरच Special ReportDevendra Fadnavis Full PC : EVM ते खातेवाटप, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची तुफान बॅटिंगAjit Pawar Full PC : विस्तार झाला पण खाते वाटप लांबणीवर,अजित पवार यांनी सगळंच सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Embed widget