एक्स्प्लोर

Mohan Bhagwat : मी 75 वर्षांचा झालोय, थांबतो म्हणालो, पण....; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्याख्यानमालेत मोहन भगवतांचे निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...

Rashtriya Swayamsevak Sangh: जो हिंदू आहे तोच संघचालक बनेल. तो एससी, एसटी, ब्राम्हण, क्षेत्रीय होईल असं नाही. जो काम करेल तोच संघचालक होईल, असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे

Mohan Bhagwat मुंबई : माझे 75 वर्ष पूर्ण झालेय. मी कार्यकर्त्यांना विचारले माझे 75 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यावेळी कार्यकर्ता म्हणाले काय अडचण आहे. त्यामुळे मी इथे बसेल हे माझ्या हातात नाही आणि इथून जाणे हे देखील माझ्या हातात नाही, तर संघाच्या हातात आहे. आतापर्यंत कुणाला निवृत्त करण्याची वेळ आली नाही. किंबहुना जो हिंदू आहे तोच संघचालक बनेल. तो एससी, एसटी, ब्राम्हण, क्षेत्रीय होईल असं नाही. जो काम करेल तोच संघचालक होईल, असं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) व्याख्यानमालेत ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाकडून मुंबईत दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून आज या व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे या व्याख्यानमालेला संबोधित करत असून कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राजकारण, सिनेमा, साहित्य, प्रशासन यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरे होत आहेत. आजच्या संवादात सरसंघचालकांनी अनेक मुद्द्यांवर महत्त्वाचं भाष्य केलंय

Mohan Bhagwat on RSS: सरसंघचालक ब्राम्हण, क्षत्रिय, क्षुद्र, बनू शकत नाही तर हिंदू बनू शकतो

संघ समजून घ्यायचा असेल तर संघाच्या जवळ यावं लागेल मग तुम्हाला संघ समजेल. विद्यमान सरसंघचालक पुढील सरसंघचालक निवडतात आणि जबाबदारीतून निवृत्ती होऊ शकते. 75व्या वर्षानंतर जबाबदारीमधूज निवृत्त होऊन काम करावं हे संघात दिसतं. मात्र मी पदावर राहावं ही माझी इच्छा नाही. संघ सांगेल तेच होईल. निवृत्तीचे कारण काय ते पाहावे, कुणाला निवृत्त करावं अशी वेळ अजून आली नाही. मात्र सरसंघचालक ब्राम्हण, क्षत्रिय, क्षुद्र, बनू शकत नाही तर हिंदू बनू शकतो, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat on Reservation : संविधानाने दिलेल्या आरक्षणाला संघाचं समर्थन

संविधानाने दिलेल्या आरक्षणाला संघाचं समर्थन आहे. संविधानाने ज्यांना आरक्षण दिलं आहे त्यांना जोपर्यंत त्यांची गरज संपत नाही तोपर्यंत ते राहायला हवं. ज्यादिवशी गरज संपेल, त्यावेळी त्यांनी सांगवं. म्हणजे आरक्षणाचा लाभ गरजवंतांना देता येईल. असेही मोहन भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat : भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील, अखंड भारत होईलच

बांगलादेशात सव्वा कोटी हिंदू आहेत, एकत्र आले तर काहीही करू शकतात. भारताच्या विभाजनापेक्षा 2047 मध्ये अखंड भारताच्या उदयाची कल्पना करा. जे सुलतान, बादशाह, इंग्रज करू शकले नाही ते आता काय होणार? भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील. हे मनसुबे कदापि पूर्ण होणार नाहीत. अखंड भारत होईलच. असा आशावाद देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलताना व्यक्त केलाय.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
Girish Mahajan: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Embed widget