एक्स्प्लोर
महिला कॉन्स्टेबलच्या मुलीचा पोलिस उपायुक्तांवर बलात्काराचा आरोप
संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबल ही पोलिस आयुक्तालयातच कार्यरत आहे. तिच्या 22 वर्षीय मुलीने पोलिस उपायुक्तांवर आरोप केला आहे.

औरंगाबाद: एमपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या बहाण्याने पोलिस उपायुक्तांनी बलात्कार केला, असा खळबळजनक आरोप महिला पोलिसाच्या मुलीने केला आहे. औरंगाबाद पोलिस उपायुक्तांवर हा आरोप करण्यात आल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबल ही पोलिस आयुक्तालयातच कार्यरत आहे. तिच्या 22 वर्षीय मुलीने पोलिस उपायुक्तांवर आरोप केला आहे.
संबंधित मुलीने याप्रकरणाची तक्रार व्हॉट्सअपद्वारे केल्यानंतर, परिमंडळ 2 चे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. उपायुक्त विनायक ढाकणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
याबाबत एबीपी माझाने राहुल श्रीरामे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळलेच, शिवाय फसवणुकीच्या उद्देशाने हा आरोप केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement




















