एक्स्प्लोर
नागपुरात पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार
नागपुरातली ही घटना असून विवाहितेच्या तक्रारीनंतर पोलीस कर्मचारी रवी जाधवला अटक करण्यात आली आहे.
नागपूर : पिस्तुलाचा धाक दाखवून पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. राज्याची उपराजधानी नागपुरातली ही घटना असून विवाहितेच्या तक्रारीनंतर पोलीस कर्मचारी रवी जाधवला अटक करण्यात आली आहे.
रवी जाधव नागपूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असून सध्या त्याची एका बिल्डरकडे सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक होती. एकटेपणाचा फायदा घेत रवी जाधवने बलात्कार केला, अशी तक्रार विवाहितेने केली आहे.
रवी जाधवची सोनेगाव परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत ओळख होती. शनिवारी पीडित महिला आणि तिच्या लहान मुलीसोबत घरात एकटी असताना रवी जाधव घरात घुसला आणि त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत पीडितेवर बळजबरी केली, असा आरोप करण्यात आला आहे.
रवी जाधवने आपल्याला आणि लहान मुलीला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला, अशी विवाहितेची तक्रार आहे. पीडित महिलेने तिचा पती घरी परतल्यानंतर त्याला सर्व घटनाक्रम सांगितला.
त्यानंतर पीडित महिलेने रविवारी तिच्या पतीसोबत सोनेगाव पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी पोलीस कर्मचारी रवी जाधवविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement